BANNER

The Janshakti News

कुंडल ग्रामपंचायत ची पाणीपट्टी वसुलीची प्रक्रिया चुकीची.. कुंडल ग्रामपंचायतीने ग्रामपंचायत अधिनियमाचे उल्लंघन करू नये. ॲड दिपक लाड



=====================================
=====================================

पलूस/कुंडल | दि.१२ नोव्हेंबर २०२२

कुंडल गावातील पाणीपट्टी धारकांना पलूस न्यायालयाकडून पाणीपट्टी थकबाकी वसुली साठी नोटीस काढण्यात आले आहे.

ग्रामपंचायत अधिनियमांमध्ये कर वसुली कशी करावी याची प्रक्रिया दिली आहे. त्यासाठी नोटीसा कश्या काढाव्यात, ठराव कसे असावेत इथपर्यंत सविस्तर प्रकिया आहे.
पाणीपट्टीसाठी ग्रामपंचायती कडून अधिनियमातील तरतुद अधीन राहूनच कर वसुली करणे गरजेचे आहे.

कर वसुलीस अडचण येत असेल तर त्यासाठी कोणती प्रकिया अवलंबावी हे सुद्धा कायद्यात दिलेले आहे. ग्रामपंचायत कर वसुली करण्यात कसूर करत असल्यास ग्रामसेवक व सदस्यांवर कारवाई करावी हे देखील कायद्यात दिलेले आहे.

परंतु अशा प्रकारची कुठलीही प्रक्रिया न पार पडता कुंडल ग्रामपंचायत यांनी लोकांना भीती घालण्यासाठी न्यायालयाचा आधार घेत पाणीपट्टी वसुलीच्या पाठवलेल्या नोटीस बेकायदेशीर आहेत असे ॲड दिपक लाड यांनी कळविले.


लोकन्यायालयाचा वापर करून अशा नोटीस पाठवता येणार नाहीत. कोर्ट केसेसची भीती दाखवून लोकांच्याकडून पैसे वसूल करायचा हा उद्योग आहे.

निवडणुकीच्या तोंडावर गोळा झालेले हे पैसे नेमके कशासाठी वापरणार हे समजायला हवे.

लोकांच्यासाठी पैसे खर्च करायचे असतील तर पाच वर्षात का वसूल केले गेले नाहीत? कर वसुली झाली नसल्यास त्यासाठी जबाबदार ग्रामसेवक व सदस्य यांच्यावर काय कारवाई झाली हे आधी स्पष्ट झाले पाहिजे. येवढेच नाही तर वसूल झालेले पैसे निवडणुकीसाठी बेकायदेशीर पणे वापरले जाणार नाहीत याची हमी कोण घेणार? असा संतप्त सवाल व्यक्त करत ॲड दिपक लाड यांनी व्यक्त केला

जुनी १४ गावांची कुंडल प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेमधून कुंडल गावाला विना तक्रार पाणी मिळत होते ,ती योजना का बंद केली.

सध्याच्या जलस्वराज्य योजनेमधून 24 तास पाणी देऊ असे ग्रामपंचायतीने सांगितले होते ,परंतु त्यापैकी किती तास पाणी मिळते याचे आत्मपरीक्षण ग्रामपंचायतने करावे.

जलस्वराज्य योजनेत ग्राहकांच्या कडून वॉटर मीटर साठी पैसे घेतले होते ते मीटर कुठे आहेत.

कुंडल गावात किती घरात लोक
विकत पाणी आणून पितात,
हा संशोधनाचा विषय आहे असेही ॲड दिपक लाड यांनी कळविले.

◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆




◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆