BANNER

The Janshakti News

समर्थ प्रशिक्षण केंद्रात भाग्यश्री घुले व अमृता कोळी प्रथम समर्थ प्रशिक्षण केंद्र सांगोलाचा शंभरटक्के निकाल



=====================================


=====================================


सांगोला | दि. १७ ऑक्टोबर २०२२

  सांगोला : महा व्यवसाय शिक्षण डिजिटल ऑनलाइन प्रशिक्षण केंद्र अंतर्गत समर्थ बहुउद्देशीय विकास संस्था संचालित समर्थ शिक्षण व प्रशिक्षण केंद्र सांगोला या केंद्रात सप्टेंबर 2022 मध्ये घेतलेल्या अंगणवाडी सुपरवायझर परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून समर्थ प्रशिक्षण विद्यालयाचा निकाल शंभर टक्के लागला आहे यामध्ये भाग्यश्री घुले व अमृता कोळी यांचा 78.75% गुण मिळवून विशेष योग्यता श्रेणीमध्ये प्रथम क्रमांक प्राप्त झाला. 

                           
अमृता कोळी 
  

                           
भाग्यश्री घुले
 
समर्थ प्रशिक्षण केंद्रात अंगणवाडी शिक्षिका ,सुपरवायझर, अंगणवाडी मदतनीस, पत्रकारिता, ब्युटी पार्लर,फॅशन डिझायनिंग, शिवणकाम या विषयाच्या अध्यापनाचे कार्य होत असते. 

प्रशिक्षण केंद्राची शंभर टक्के निकालाची परंपरा कायम राहिली आहे. 
यामध्ये योग्य मार्गदर्शन व प्राध्यापकाचे अध्यापन कौशल्य याचाही मोठा सहभाग आहे.

यावेळी संस्थेचे अध्यक्ष दिगंबर साळुंखे, प्राचार्य प्रशांत मिसाळ,सहशिक्षिका सोनिया कांबळे,संध्या कांबळे,नयना सपताळ,सुनीता भुसनुर संस्थेचे उपाध्यक्ष महेश दत्तू,सचिव प्रमिला साळुंखे,खजिनदार मेघश्याम सुरवसे,संचालक इकबाल पाटील,शरदचंद्र पवार,लता पाटील यांचेसह पालकांनी यशाबद्दल अभिनंदन केले.

***************************************




***************************************

◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆




◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆