BANNER

The Janshakti News

१५०००/- रु. लाच स्वीकारताना गट शिक्षण अधिकारी व जि.प.शाळेचा उप शिक्षक ACB च्या जाळ्यात...πππππππππππππππππππππππππππππ
πππππππππππππππππππππππππππππ

======================================
==============================सांगली | दि. १५ ऑक्टोबर २०२२


सांगली : तक्रारदार यांनी अर्जीत रजा मंजूर होणेबाबतचा अर्ज गट शिक्षण अधिकारी पंचायत समिती जत यांना सादर केला होता... सदरची रजा मंजूर करून देण्यासाठी पंचायत संमिती जत येथील गट शिक्षण अधिकारी साळुंखे यांनी व जिल्हा परिषद कन्नड शाळा सिंथिहळ्ळ वस्ती, मुचंडी ता. जत येथील उप शिक्षक संन्नोळी यांनी तक्रारदार यांचेकडे तिन महिन्याच्या रजेसाठी प्रत्येक महिन्याचे २०,०००/- प्रमाणे ६०,०००/- रूपये लाचेची मागणी केली असल्याबाबतचा तक्रारी अर्ज दि.०६.१०.२०२२ रोजी अँन्टी करप्शन ब्युरो सांगली पथकास दिला होता.


तक्रारदार यांनी दिलेल्या तक्रारीनुसार व ब्युरोच्या कार्यप्रणालीप्रमाणे  पडताळणी मध्ये लोकसेवक सन्नोळी उप शिक्षक यांनी तक्रारदार यांचेकडे ६०,०००/- रूपये लाचेची मागणी केली असल्याचे निष्पन्न झाले. गट शिक्षण अधिकारी साळुंखे यांनी तक्रारदार यांचेकडे चर्चेअंती प्रत्येक महिन्याचे १५,०००/- रूपये प्रमाणे तीन महिन्याच्या अर्जीत रजेसाठी ४५,०००/- रूपये लाचेची मागणी करून एका महिन्याचे १५,०००/- रूपये उप शिक्षक सन्नोळी यांचेकडे देण्याबाबत सांगीतल्याचे निष्पन्न झाले.


त्यानंतर दि.१४.१०.२०२२ रोजी जिल्हा परिषद कन्नड शाळा सिंधिहळ्ळ वस्ती, मुचंडी ता. जत जि.सांगली या ठिकाणी लोकसेवक सन्नोळी उप शिक्षक यांचे विरुध्द सापळा कारवाई आयोजीत केली असता सापळा कारवाई वेळी लोकसेवक सनोळी यांनी तक्रारदार यांचेकडे लाचेची मागणी करून १५,०००/- रूपये तक्रारदार यांचेकडून स्विकारले नंतर त्यांना लाच लुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस अधिकारी यांनी रंगेहात पकडले आहे.

त्यानंतर लोकसेवक साळुंखे, गट शिक्षण अधिकारी यांना त्याचे घरी जात असताना उटगी येथील कळ्ळी वस्ती येथे ताब्यात घेतले आहे.


 रजिलाल मऱ्याप्पा साळुंखे, वय ५२ वर्ष, गट विकास अधिकारी, अतिरीक्त कार्यभार गट शिक्षण अधिकारी पंचायत समीती जत रा. मु.पो. डोणज ता. मंगळवेढा जि. सोलापूर व  कांताप्पा दुंडाप्पा संन्नोळी, वय ४२ वर्ष, उप शिक्षक जिल्हा परिषद प्राथमीक कन्नड शाळा सिंधिहळ्ळ वस्ती, मुचंडी
ता. जत जि.सांगली रा. बेलदार गल्ली डॉक्टर हिट्टी बिल्डींग जत ता. जत जि. सांगली यांचे विरुध्द जत पोलीस स्टेशन येथे लाचलुचपत प्रतिबंधक अधिनियमाखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


सदरची कारवाई  पोलीस उप अधीक्षक  श्री. सुजय घाटगे, पोलीस निरीक्षक श्री. विनायक भिलारे , पोलीस निरीक्षक श्री. दत्तात्रय पुजारी , पोलीस अंमलदार अविनाश सागर , सलीम मकानदार , सिमा माने , धनंजय खाडे , संजय संकपाळ , प्रितम चौगुले , राधिका माने , चालक स्वप्नील भोसले यांनी केली आहे.

◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆
◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆