=====================================
=====================================
भिलवडी | दि. १२ ऑक्टोबर २०२२
भिलवडी (ता.पलूस) : सध्या तरुणांना वाढदिवसाचे खुप वेध लागलेले असते, मग त्या बरोबर होतो तो अनावश्यक, अवाढव्य खर्च. मात्र पलूस तालुक्यातील माळवाडी येथील आर. के कंन्स्ट्रक्शनचे सर्वेसर्वा इंजिनिअर मा. राजू चौधरी हे प्रत्येक वर्षी आपला वाढदिवस सामाजिक उपक्रम राबवून साजरा करतात. हिच परंपरा अखंडित ठेवत त्यांनी १० ऑक्टोबर रोजी आपला वाढदिवस बांधकाम कामगारांची सेवा करुन साजरा करत तरुण पिढीला एक आदर्श घालून दिला आहे.
एस. ए . मल्टीसर्व्हिसचे संग्राम मोटकट्टे आणि आक्षय मोरे यांच्या सहकार्याने व आर के कन्ट्रक्शनच्या,वतीने घेण्यात आलेल्या कामगार श्रम कार्ड काढणे, कामगार नाव नोंदणी करणे व आरोग्य कार्ड काढणे या उपक्रमाला माळवाडी व परीसरातील बांधकाम कामगारनी भर भरून प्रतिसाद दिला. जवळ जवळ १२० बांधकाम कामगारांनी आपले कार्ड काढून घेतले.
यावेळी आमच्या द जनशक्ती न्यूजशी बोलताना राजू चौधरी म्हणाले की , जी लोकं इतरांच्या स्वप्नांनातील घर साकारण्यात आपले .आयुष्य खर्च करतात .. पण त्यांना मात्र स्वतःच्या शरीराची देखभाल सुद्धा करता येत नाही. म्हणून शासनाकडून जो लाभ मिळतो त्यासाठी म्हणून हा छोटासा प्रयत्न आर.के.कंट्रक्शन च्या वतीने शिबिरा मार्फत करण्यात आला..हा समाज उपयोगी उपक्रम राबवल्याचे सार्थक झाले.
यावेळी बांधकाम कामगार मोठ्या संख्येने उपस्थित होते.
◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆
◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆