BANNER

The Janshakti News

भिलवडीत सानेगुरुजी संस्कार केंद्राचे फटाके नको पुस्तके वाचू अभियान



●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●





●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●

===========================================================================

भिलवडी | दि. ११ ऑक्टोबर २०२२

भिलवडी (ता.पलूस) येथील पूज्य सानेगुरुजी संस्कार केंद्राच्या वतीने प्रति वर्षी प्रमाणे या हि वर्षी फटाके नको पुस्तके वाचू अभियान राबविण्यात येणार असल्याची माहिती संस्कार केंद्राचे केंद्र प्रमुख श्री.सुभाष कवडे सर यांनी दिली आहे. 
याबाबत माहिती देताना सुभाष कवडे सर यांनी सांगितले कि या अभियाना अंतर्गत भिलवडी आणि परिसरातील शालेय विद्यार्थ्यांना फटाक्याचे दुष्परिणाम सांगितले जाणार आहेत. दिनांक १३ ऑक्टोबर २०२२ ते २२ ऑक्टोंबर २०२२ या कालावधीत विद्यार्थ्यांकडून फटाके न उडविण्याबाबत संकल्पपत्रे भरून घेण्यात येणार आहेत. तसेच शाळामध्ये प्रबोधन पत्रके देण्यात येणार आहेत. व  विद्यार्थ्यांना आर्थिक नुकसान प्रदूषण,आजारी वृद्ध नागरिकांना होणारा त्रास याबाबत माहिती देण्यात येणार असून विद्यार्थ्यांना फटाके न उडविण्याबाबत प्रतिज्ञा देण्यात येणार आहे. तसेच गावातील सार्वजनिक फलकांच्याद्वारे विद्यार्थी व ग्रामस्थ यांचे प्रबोधन करण्यात येणार आहे. 
या अभियानांतर्गत साधना साप्ताहिकाचा साधना बालकुमार दिवाळी अंकहि ५०% सवलतीत देण्यात येणार आहे. तसेच अन्य संस्कारक्षम पुस्तकेही अत्यंत अल्प किमतीत देण्यात येणार आहेत.कोरोनाच्या पार्श्वभूमीवर फटाक्यांचे दुष्परिणाम ध्यानात घेऊन या अभियानात जास्तीत जास्त विद्यार्थी व पालकांनी सहभागी व्हावे असे आवाहन संस्कार केंद्राच्या वतीने सुभाष कवडे यांनी केले आहे. 
सवलतीत पुस्तके घेण्यासाठी ९६६५२२१८२२ या भ्रमणध्वनीवर संपर्क साधावा

◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆ ◆◆◆◆◆◆





◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆