BANNER

The Janshakti News

पलूस तालुक्यातील अवैध धंदे कायमस्वरूपी बंद करण्याची मागणी... राज्याचे कामगार मंत्री तथा सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री मा.सुरेश (भाऊ) खाडे यांना दिले लेखी निवेदन...


●●●●●●◆●◆◆●●●●●●●◆◆◆◆◆◆◆●●●●●●●●●




●●●●◆●●◆◆◆◆◆◆◆◆●●●●●●●●◆◆◆◆◆●●●●

=====================================


=====================================

भिलवडी | दि. १०/१०/२०२२

पलूस तालुका रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गट तसेच भिलवडी (ता.पलूस) येथील असंघटित कामगार संघटना यांचे वतीने असंघटित कामगारांना शासकीय सुविधा मिळणे बाबत तसेच पलूस तालुक्यातील अवैद्य व्यवसाय पूर्णपणे बंद करणे बाबत लेखी निवेदन महाराष्ट्र राज्याचे कामगार तथा सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री मा. सुरेश (भाऊ) खाडे यांना ९ ऑक्टोंबर २०२२ रोजी सांगली येथे देण्यात आले.


या निवेदनामध्ये असे नमूद करण्यात आले आहे की, सध्या आपण महाराष्ट्र राज्याचे कामगार तथा सांगली जिल्हा पालकमंत्री म्हणून कार्यरत आहात.आपण सध्या अवैध्य व्यवसाय बंद होण्याबाबत कौतुकास्पद भूमिका बजावत आहात.आज देशाची तरुण पिढी दारू, जुगार, मटका याकडे ओढली जात आहे.त्यामुळे संपूर्ण कुटुंबच उध्वस्त होण्याची भीती निर्माण झालेली आहे. तरुण पिढी वाममार्गाकडे ओढली जात असल्याने दारूबंदी व मटका, जुगार असे अवैध धंदे कायमस्वरूपी बंद व्हावे अशी मागणी आम्ही आरपीआय पलूस तालुका आठवले गटाच्या वतीने करीत आहोत.




या निवेदनाची आपण गांभीर्याने दखल घेऊन,देशासह भिलवडी गावातील भावी युवा पिढी अवैध्य व्यवसाय, दारू,मटका व जुगार या व्यसनापासून दूर रहावी व गोरगरिबांचे प्रपंच वाचावे या उद्देशाने किमान भिलवडी गावातील तरी अवैध व्यवसाय बंद करावेत अशी आम्ही आपणास कळकळीची विनंती करीत आहोत. आपणास माहितीसाठी आम्ही सांगू इच्छितो की, याबाबतचे लेखी निवेदन आम्ही १५ ऑगस्ट २०२२ रोजी भिलवडी ग्रामपंचायतीला दिले होते. त्याबाबत २ ऑक्टोबर च्या ग्रामसभेवेळी चर्चाही झाली परंतु पुढील प्रक्रिया थंडावली आहे. याबाबत ही आपण संबंधित ग्रामपंचायत प्रशासकीय अधिकाऱ्यांकडून माहिती मागवून घ्यावी व असे समाजहिताचे ठराव मंजूर करण्यासंदर्भात कामचुकारपणा करणाऱ्या प्रशासकीय अधिकाऱ्यांवर कारणे दाखवा नोटीस बजावावी अशी ही मागणी आम्ही आरपीआय पलूस तालुका आठवले गटाच्या वतीने करीत आहोत.त्याच बरोबर हिंदुस्तान पेट्रोलियम कार्पोरेशन लि. हजारवाडी येथे गेल्या दहा ते पंधरा वर्षापासून कार्यरत असलेल्या हंगामी कामगारांवरती अन्याय होत असून, यातील काही कामगारांना कामावरून कमी करण्यात आले असल्याने त्याची सखोल चौकशी करून दोषींवर कायदेशीर कारवाई करावी अशी ही मागणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाचे पलूस तालुका कार्याध्यक्ष अमरजित कांबळे यांनी लेखी निवेदनाद्वारे महाराष्ट्र राज्याचे कामगार मंत्री तथा सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री मा. सुरेश (भाऊ) खाडे यांच्याकडे केली आहे तर असंघटित कामगारांना शासनाकडून मिळणाऱ्या सोयी सुविधा, शासकीय योजना या नोंदणीकृत कामगारांप्रमाणे विविध क्षेत्रांमध्ये तुटपुंजा पगारावरती काम करणाऱ्या, कोणताही शासकिय मोबदला न मिळणाऱ्या असंघटित कामगारांना मिळाव्यात अशा आशयाचे लेखी निवेदन असंघटित कामगार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष शशिकांत कांबळे यांनी महाराष्ट्र राज्याचे कामगार मंत्री तथा सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री मा. सुरेश (भाऊ) खाडे यांना सांगली येथे दिले.


यावेळी संबंधित निवेदनाचा स्वीकार करून, संबंधित निवेदनाचा विचार करून योग्य निर्णय घेतला जाईल तसेच असंघटित कामगारांच्या बाबतीत पुढील महिन्यांमध्ये योग्य तो निर्णय घेण्यात येईल असे आश्वासन मंत्रीमहोदय सुरेश (भाऊ) खाडे यांनी आरपीआय पलूस तालुका कार्याध्यक्ष अमरजीत कांबळे तसेच असंघटित कामगार संघटना संस्थापक अध्यक्ष शशिकांत कांबळे यांना सांगली येथील वसंतदादा औद्योगिक वसाहत येथे आयोजित कार्यक्रमावेळी दिले आहे. यावेळी मानवाधिकार संरक्षण संघटना पलूस तालुका सचिव पंकज गाडे यांच्यासह आर पी आय चे कार्यकर्ते व कामगार संघटनेचे सदस्य उपस्थित होते.

◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆




◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆