BANNER

The Janshakti News

आमदार अरुण (आण्णा) लाड यांच्या फंडातून वसगडे येथील वॉल कंपाउंड साठी निधी मंजूर..



=====================================


=====================================

भिलवडी | दि.18 / 10 / 2022
       
आमदार अरुण अण्णा लाड यांच्या निधीतून सात लाख व ग्रामपंचायत वसगडे यांच्या फंडातून एक लाख असे पाण्याच्या टाकीला वॉल कंपाउंड कामासाठी आठ लाखाचा निधी मंजूर करण्यात आला या कामाचा शुभारंभ माजी जिल्हा परिषद सदस्य व गटनेते  शरद भाऊ लाड व सुरेंद्र भैय्या वाळवेकर यांच्या हस्ते करण्यात आला.
   यावेळी शरद भाऊ लाड म्हणाले आजपर्यंत वसगडे गावाला नेहमीच आमदार अरुण आण्णा लाड व सुरेंद्र भैय्या वाळवेकर यांनी निधी दिला आहे त्यामुळे वसगडे गावचा विकास होत आहे इथून पुढील काळात वसगडे गावासाठी निधी उपलब्ध करून दिला जाईल.
 यावेळी सुरेंद्र भैय्या वाळवेकर म्हणाले आमदार अरुण अण्णा लाड यांनी वसगडे गावासाठी कायम निधी देत असतात आण्णानी कधीही पक्ष बघून काम केले नाही नेहमी कोणताही पक्ष असुदे निधी पुरवला आहे तर वसगडे गावासाठी आजपर्यंत भरपूर निधी दिला आहे व इथून पुढील काळात निधी देतील असा विश्वास आहे.तर वसगडे गावचे सरपंच श्रेणीक पाटील यांनी वसगडे गावचा भरपूर विकास केला आहे असा कामसू सरपंच वसगडे गावाला लाभला आहे इथून पुढील काळात वसगडे गावासाठी जर निधी लागला तर खासदार संजयकाका पाटील,व आमदार अरुण आण्णा लाड यांच्या माध्यमातून पाठपुरावा करून निधी उपलब्ध करून दिला जाईल अशी ग्वाही माजी जिल्हा परिषद सदस्य सुरेंद्र भैय्या वाळवेकर यांनी वसगडे येथे कामाच्या शुभारंभ प्रसंगी दिली.
      यावेळी वसगडे गावचे सरपंच श्रेणीक पाटील,उपसरपंच संपतराव पवार,धन्यकुमार पाटील,संजय पाटील,जवाहर बापू पाटील,सचिन खोत,आदी नागरिक उपस्थित होते .

उदघाटन प्रसंगी शरदभाऊ लाड ,सुरेंद्र भैय्या वाळवेकर, श्रेणीक पाटील 

¶¶¶¶¶¶¶¶¶¶¶¶¶¶¶¶¶¶¶¶¶¶¶¶¶¶¶¶¶¶¶¶¶





¶¶¶¶¶¶¶¶¶¶¶¶¶¶¶¶¶¶¶¶¶¶¶¶¶¶¶¶¶¶¶¶¶

◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆




◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆