BANNER

The Janshakti News

बुरुंगवाडी येथे स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव मोठ्या उत्साहात साजरा..



बुरुंगवाडी येथे स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव मोठ्या उत्साहात साजरा..

=====================================


=====================================

भिलवडी | दि.१६ ऑगस्ट २०२२

बुरुंगवाडी तालुका पलूस येथे स्वातंत्र्याचा 75 वा अमृत महोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
जि. प. शाळा बुरुंगवाडी येथील ध्वजवंदन शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष संदीप शंकर जाधव यांच्या हस्ते करण्यात आले व ग्रामपंचायत कार्यालय येथे ध्वजवंदन द्राक्षे गुरू वसंतराव माळी सर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी विद्यार्थ्यांनी भारत माता की जय.. वंदे मातरम च्या घोषणा देत गावातून प्रभात फेरी काढली व देश भक्‍तिपर गीते सादर केली.




यावेळी जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष संदीप जाधव यांच्या वतीन मसाले दुधाचे वाटप करण्यात आले व विद्यार्थ्यांना खाऊवाटप देखील  अध्यक्षांच्या हस्ते करण्यात आले. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त स्वातंत्र्याच्या लढ्यात देशासाठी बलिदान देणाऱ्या क्रांतिवीरांना अभिवादन करण्यासाठी व तिरंग्याला सलामी देण्यासाठी गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. 


ग्रामपंचायतीच्या वतीने स्वतंत्र सैनिक अशोक तावदर व जि. प. शाळेस ई लर्निंग साठी  ज्यांनी एलईडी टीव्ही  दिला ते श्रीकांत मारुती जाधव यांचा सत्कार करण्यात आला यावेळी गावातील प्रतिष्ठित नागरिक ग्रामपंचायत सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते. गावामधून ब्रह्मानंद विद्यालय ब्रह्मानंद नगर व जि. प. शाळा  शाळेतील विद्यार्थी व शिक्षकांनी गावातून प्रभात फेरी काढली. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त गावांमध्ये हर घर तिरंगा नियोजन करण्यात आले होते.




●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●



        चलो नांद्रे   चलो नांद्रे   चलो नांद्रे
 
गुरुवार दिनांक 18 ऑगस्ट 2022 रोजी नांद्रे ता. मिरज  येथे माजी खासदार , स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष राजू शेट्टी साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये दुपारी 3 वाजता भव्य शेतकरी मेळावा.


●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●

◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆



◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆