BANNER

The Janshakti News

स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सवा निमित्त गुरव समाज संघटनेचा एक अभिनव अनोखा उपक्रम..



=====================================


=====================================

भिलवडी | दि.१६ ऑगस्ट २०२२

 सांगली जिल्ह्यातील पलूस तालुक्यामधील स्वातंत्र्यसैनिकांचे माहेरघर असलेले कुंडल गावातील शंभरहून अधिक स्वातंत्र्यसैनिक या कुंडल गावच्या मातीत घडले, त्या ज्येष्ठ स्वातंत्र्य सैनिकापैकी हयात असणारे स्वातंत्र्य सैनिक मा. श्री वीरपक्ष लुपने (आबा) आणि त्यांच्या धर्मपत्नी यांच्या घरी सदिच्छा भेट देऊन अखिल गुरव समाज संघटनेच्या वतीने त्यांचा अभिमानास्पद कार्यसत्कार सोहळा संघटनेच्या पदाधिकाऱ्यांच्या कडून करण्यात आला. 
यावेळी निवास (अप्पा)  गुरव भुवनेश्वरवाडी ,
प्रदीप गुरव आणि सुधीर गुरव  वाळवा  ,  रोहित गुरव बुर्ली ,आदी समाज बांधव उपस्थित होते.


  स्वातंत्र्य सैनिक मा. श्री वीरपक्ष लुपने (आबा) आणि त्यांच्या धर्मपत्नी यांच्याशी बोलत असताना त्यांच्या जीवनातील स्वातंत्र्यासाठीचा संघर्ष स्वातंत्र्यासाठी त्यांची किंवा सर्व स्वातंत्र्य सैनिकांचे धडपड हे सर्व त्यांच्या तोंडून ऐकताना अंगावरती शाहारे येत होते. स्वातंत्र्यासाठीची त्यांची धडपड ही त्यांच्या बोलण्यामध्ये त्यांच्या तडफदारपणामध्ये आम्हाला दिसून येत होती.
सलाम त्यांच्या संघर्षाला, त्यांच्या कार्याला, त्या परिस्थितीमध्ये स्वतःला सांभाळून सावरून ठेवणाऱ्या त्यांच्या धर्मपत्नीला आणि आबांना अखिल गुरव समाज संघटनेच्या वतीने मानाचा मुजरा


  स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवाचा दिवस आमच्या जीवनामध्ये आबांच्या मुलाखतीच्या स्वरूपात अविस्मरणीय राहील असे गुरव समाज संघटनेच्या पदाधिकारी यांनी सांगितले.



●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●



●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●