BANNER

The Janshakti News

स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवा निमित् शहीद जवान फाऊंडेशन खंडोबाचीवाडी यांच्यावतीने रक्तदान शिबीराचे आयोजन.. शहीद जवानांच्या स्मरणार्थ जपली सामाजिक बांधिलकी..



======================================


======================================

भिलवडी | दि. १५ ऑगस्ट २०२२

रक्तदान म्हणजेच जीवनदान, रक्तदान हेच सर्वश्रेष्ठ दान असे समजले जाते. सध्या कोरोनाच्या काळात रुग्णालयांमध्ये रक्तपेढीमधील रक्तसाठा कमी पडू लागला आहे. हीच गरज लक्षात घेऊन शहीद जवान फाऊंडेशन खंडोबाचीवाडी यांनी स्वातंत्र्यदिनानिमित्त रक्तदान शिबीर आयोजित केले होते.


खंडोबाचीवाडी ता. पलूस येथील शहीद जवान फाउंडेशनच्या वतीने स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून, शहीद जवानांच्या स्मरणार्थ सामाजिक बांधिलकी म्हणून रक्तदान शिबिराचे आयोजन केले. यासाठी 


सांगली येथील रक्तपेढी विभागाचे चांगले सहकार्य लाभले. सदर रक्तदान शिबिरामध्ये भिलवडी, माळवाडी, धनगाव, आमणापूर, भिलवडी स्टेशन सह परिसरातील रक्तदात्यांनी सहभाग घेऊन रक्तदान करून सामाजिक बांधिलकी जपली. हे रक्तदान शिबिर यशस्वी करण्यासाठी शहीद जवान फाऊंडेशनचे पदाधिकारी, सदस्य व खंडोबाचीवाडी येथील ग्रामस्थांचे सहकार्य लाभले.

◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆





◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆



◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆