BANNER

The Janshakti News

भिलवडी शिक्षण संस्थेच्या इंग्लिश मिडियम स्कूलचा " फ्रुट चॅट " उपक्रम...



भिलवडी शिक्षण संस्थेच्या 
इंग्लिश मिडियम स्कूलचा " फ्रुट चॅट " उपक्रम...

======================================


======================================

भिलवडी | दि. ६ जुलै २०२२

हल्ली वेळेचा अभाव असल्याने व्यक्ती झटपट गोष्टी करण्यामध्ये अधिक रस घेतो. पूर्वी थोड्याशा भुकेला पटकन एखादे फळ खाल्ले जात असे तर हल्ली फास्ट फूड किंवा जंक फूडचा आधार घेतला जातो. हे पदार्थ आपल्या जीवनशैलीचा भाग झाले आहेत. पण, त्याचा शरीरावर दूरगामी दुष्परिणाम होऊ शकतो. अनेक विकारांसाठी हे पदार्थ मूळ ठरू शकतात. त्याऐवजी आपण फळे खाल्ल्यास अनेक आजारांपासून आपला बचाव होऊ शकतो.


आहार संतुलित असेल तर आरोग्य चांगले राहण्यास मदत होते. मोसमी फळांचे अवश्य सेवन करावे, असे आपण लहानपणापासून ऐकत आलो आहेच. या फळांच्या सेवनामुळे आजारांपासून बचाव होतो.

निरनिराळ्या प्रकारची फळे खाल्ल्याने ती खाणाऱ्यांचे आरोग्य सुधारते आणि त्यांची रोगप्रतिकारक क्षमता वाढते कारण फळे ही जीवनसत्त्वे, पोषणमूल्ये, फायबर आणि ऍण्टीऑक्सिडंटस् यांचे साठे असतात. मात्र प्रत्येक फळाचे एक वेगळे वैशिष्ट्य असते. ते समजून घेऊन आरोग्यासाठी प्राधान्याने कोणती फळे खावीत हे ठरवता आले पाहिजे.


यासाठी भिलवडी तालुका पलूस येथे भिलवडी शिक्षण संस्थेच्या 
इंग्लिश मिडियम स्कूल,  मध्ये बुधवार दिनांक १ जुलै २०२२ रोजी फ्रुट चॅट उपक्रम घेण्यात आला. 
   यावेळी शाळेच्या  मुख्याध्यापिका  सौ. स्मिता माने मॅडम  यांनी निरोगी जीवनासाठी फलाहाराचे  महत्व मुलांना समजून सांगितले 


        तसेच सौ. वर्षा कदम मॅडम यांनी मुलांना फळांची नावे ,त्यांतील बिया व त्यांतील असणाऱ्या घटकांची माहिती दिली. मुलांनी फळे खावीत व त्यांना ती  खाण्याची आवड निर्माण व्हावी म्हणून शाळेने हा उपक्रम आयोजित केला होता.
      यावेळी  मुलांनी शिक्षकांना आम्ही रोज एक फळ खाणार असल्याची ग्वाही दिली. या उपक्रमात शाळेतील सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर सेवक व विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला.

◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆




◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆