BANNER

The Janshakti News

सुरेंद्र भैय्या वाळवेकर यांनी पाच वर्षाच्या काळात भिलवडी जिल्हा परिषद गटात प्रचंड विकास साधला ; खासदार संजय काका पाटील



सुरेंद्र भैय्या वाळवेकर यांनी पाच वर्षाच्या काळात भिलवडी जिल्हा परिषद गटात प्रचंड विकास साधला ; खासदार संजय काका पाटील
 
======================================


======================================

भिलवडी | दि. ६ जुलै २०२२

      लोकप्रिय जिल्हा परिषद सदस्य सुरेंद्र भैय्या वाळवेकर यांनी पाच वर्षाच्या काळात प्रचंड विकास साधला असे प्रतिपादन सांगली जिल्ह्याचे खासदार संजय काका पाटील यांनी केले ते भिलवडी येथे विविध विकास कामाच्या शुभारंभ प्रसंगी बोलत होते. 


      सुरेंद्र भैय्या वाळवेकर यांच्या प्रयत्नातून मंजूर झालेले विकास कामे पुढीलप्रमाणे चोपडेवाडी ते महावीर नगर पूल 31 लाख ,बोरबन रस्ता कॉंक्रिटीकरण करणे पाच लाख ,बोरबन शाळा बांधणे पंधरा लाख, माळवाडी शिवाजी नगर अंतर्गत ररस्ते डांबरीकरण करणे चिंचवडे घर मेन रोड- दहा लाख माळवाडी अंतर्गत रस्ते महेश वाळवेकर घर ते भालचंद्र सकळे दहा लाख ,माळवाडी रस्ता डांबरीकरण करणे जाधव सर घर ते माळी घर  दहा लाख ,वसगडे अंतर्गत भुयारी गटार सात लाख अशा कामाच्या उद्घाटन प्रसंगी खासदार संजय काका पाटील बोलत होते.यावेळी दक्षिण भाग सोसायटीच्या नवनिर्वाचित संचालकांचा सत्कार करण्यात आला. यामध्ये किशोर महिंद ,जनार्दन साळुंखे,उल्लास ऐतवडे, हाराळे सर,व महेश पाटील सर यांची पीएचडी शिक्षण शिक्षक मार्गदर्शक पदी निवड झालेबद्दल  सत्कार करण्यात आला .तर रात्र न दिवस आंबूलन्स सेवा बजावणाऱ्या सनी गायकवाड, शौकत नदाफ,सोन्या माळी यांचा देखील सत्कार करण्यात आला.


      यावेळी खासदार संजय काका पाटील म्हणाले सुरेंद्र भैय्या वाळवेकर यांनी भिलवडी जिल्हा परिषद गटामध्ये प्रचंड विकास केला आहे. सुरेंद्र भैय्या वाळवेकर यांना पुढील काळात कितीही निधी लागुदे कमी पडू देणार नाही राज्यात आता आपले सरकार आहे. त्यामुळे त्यांना कुठेही निधी कमी पडू देणार नाही.
       यावेळी सुरेंद्र भैया वाळवेकर म्हणाले की खासदार संजय काका पाटील यांच्या माध्यमातून भिलवडी जिल्हा परिषद गटामध्ये भरपूर विकास कामे खेचून आणली आहेत. पुढील काळात संजय काकांनी असेच लक्ष ठेवावे. 




         
 माजी सरपंच विजयकुमार चोपडे म्हणाले , काका राज्यामध्ये काँग्रेसचे सत्ता असताना कोणताही विकास झाला नाही आता आपलं सरकार आलं आहे त्यामुळे तुम्ही सहभाग घेऊन भिलवडी व परिसरातील गावांसाठी निधी द्यावा.
            यावेळी भिलवडी गावचे माजी जिल्हा परिषद सदस्य सुरेंद्र भैय्या वाळवेकर माजी सरपंच विजयकुमार चोपडे ,चोपडेवाडी गावचे नेते रवींद्र यादव, महादेव मामा,व्यापारी संघटनेचे माजी अध्यक्ष रमेश पाटील,भाजपचे भिलवडी अध्यक्ष मुनीरखान पठाण, दक्षिनभाग सोसायटीचे व्हाईस चेअरमन किशोर  महिंद , श्रीकांत निकम  ,माळवाडी चे माजी सरपंच बाळकृष्ण , माजी सरपंच जनार्दन साळुंखे , माजी सदस्य संजय जाधव ,चवगौंड चिंचवडे, प्रताप पुजारी , सुबराव भोळे यांच्या सह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.


◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆




◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆