BANNER

The Janshakti News

दिव्यांग विधवा घटस्फोटीतांचा भव्य वधू वर परिचय मेळावा संपन्न...दिव्यांग विधवा घटस्फोटीतांचा भव्य वधू वर परिचय मेळावा संपन्न...

======================================


======================================

इस्लामपूर | दि. 3 जुलै 2022

इस्लामपूर  तालुका वाळवा जिल्हा सांगली येथील राजारामबापू ज्ञान प्रबोधनी येथे जयंत दारिद्र्य निर्मूलन राष्ट्रवादी दिव्यांग सेल व कर्मवीर वधू वर सूचककेंद्र यांची वतीने दिव्यांग विधवा घटस्फोटीतांचा भव्य वधू वर परिचय मेळावा घेण्यात  आला. या मेळाव्याला भरभरून प्रतिसाद मिळाला साडेतीनशे दिव्यांगानी यामध्ये सहभाग नोंदवला. 


माननीय नामदार जयंत पाटील व युवा नेते प्रतीक दादा पाटील यांच्या  सहकार्यातून या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्याला राजारामबापू कारखाना जयंत दारिद्र्य निर्मूलन यांचे समन्वयक श्री. इलियास पिरजादे यांनी सर्व नियोजन केले दिव्यांगांची सर्व सोय चहा नाष्टा जयंत दारिद्र्य निर्मूलन यांचे कडून करण्यात आली. यावेळी राष्ट्रवादी दिव्यांग  सेल चे वाळवा तालुका अध्यक्ष श्री रामभाऊ पाटील यांनी नियोजन केले.


 यावेळी वाळवा तालुका अध्यक्ष  विजय बापू पाटील , वाळवा तालुका  संजय गांधी निराधार योजनेचे  अध्यक्ष  संजय बापू पाटील ,  शहाजी बापू पाटील राजारामबापू बँकेचे चेअरमन शामराव अण्णा , विभागीय अध्यक्ष प्रकाश पवार , जिल्हाध्यक्ष  श्री संभाजी ठोंबरे , संजय कटारे , तुकाराम पवार , विश्वजीत पवार ,आदींसह दिव्यांग बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी बोलताना श्री पिरजादे  म्हणाले  दिव्यांगांचा  विवाह ठरल्यास  त्या विवाहासाठी  जोडप्यांना  सर्व ती मदत  जयंत दारिद्र्य निर्मूलन मार्फत  करण्यात येईल.  शेवटी उपस्थित सर्वांचे आभार  श्री. प्रकाश पवार यांनी मानले.

◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆
◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆