BANNER

The Janshakti News

भिलवडी गावात विधवा प्रथा बंद .. शासनाच्या आदेशानुसार ग्रामपंचायतीचा ठराव.. ग्रामपंचायती कडून राज्यमंत्री डॉ. विश्वजित कदम यांना दिली ठरावाची प्रत...भिलवडी गावात विधवा प्रथा बंद ..
 
शासनाच्या आदेशानुसार ग्रामपंचायतीचा ठराव..

ग्रामपंचायती कडून राज्यमंत्री डॉ. विश्वजित कदम यांना दिली ठरावाची प्रत...

==============================
==============================

भिलवडी | दि. 01 जून 2022

भिलवडी ता.पलूस येथील ग्रामपंचयतीमार्फत विधवा प्रथा बंद करणेबाबत ठराव करण्यात  आला. सदर ठरावाची प्रत राज्याचे  सहकार व कृषी राज्यमंत्री डॉ.विश्वजीत कदम यांना देण्यात आली.

भिलवडीकरानी शासनाच्या आदेशानुसार विधवा प्रथा बंदीचे उचलेले पाऊल कौतुकास्पद  असल्याचे प्रतिपादन मंत्री डॉ.विश्वजित कदम यांनी केले. निधनानंतर अंत्यविधी वेळी पत्नीच्या कपाळावरील कुंकू पुसणे,गळ्यातील मंगळसूत्र तोडणे,हातातील बांगड्या फोडणे,पायातील जोडवी काढणे अशा जुन्या प्रथा, परंपरा पाळल्या जातात. विधवांना कोणत्याही धार्मिक,सामाजिक व शुभकार्यात सहभागी करून घेतले जात नाही.कायद्याने प्रत्येक व्यक्तीला सन्मानाने जगण्याचा अधिकार दिलेला असताना केवळ विधवा प्रथेमुळे महिलांच्या व्यक्ती स्वातंत्र्यावर गदा येते.महिलेचा सन्मान करण्यासाठी संपूर्ण भिलवडी गावात या प्रथेला मूठमाती देण्याचा संकल्प करण्यात आला.

सरपंच विद्या पाटील,उपसरपंच पृथ्वीराज पाटील यांनी ठरावाची प्रत राज्यमंत्री डॉ.विश्वजीत कदम यांना दिली.

यावेळी पलूस चे तहसीलदार निवास ढाणे,महेंद्र लाड,बाळासाहेब मोहिते ,चंद्रकांत पाटील , राजेंद्र सावंत , बाळासाहेब मोरे ,राजेंद्र मोहिते , विलास पाटील,शहाजी गुरव, बी. डी.पाटील, बाबासो मोहिते,आदी उपस्थित होते.
◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆