BANNER

The Janshakti News

राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या स्मृती शताब्दी वर्षानिमित्त दसरा चौक, कोल्हापूर येथे राज्यस्तरीय अभिवादन सभेचे आयोजन..





राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या स्मृती शताब्दी वर्षानिमित्त दसरा चौक, कोल्हापूर येथे राज्यस्तरीय अभिवादन सभेचे आयोजन..

-------------------------------------------------------------------


-------------------------------------------------------------------

कोल्हापूर | दि. ५ मे २०२२

राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या स्मृती शताब्दी वर्षानिमित्त भारत मुक्ती मोर्चा, छत्रपती क्रांती सेना, राष्ट्रीय पिछडा वर्ग मोर्चा व राष्ट्रीय किसान मोर्चा या संघटनांच्या संयुक्त विद्यमाने शुक्रवार, दि- 6 मे 2022 रोजी सायंकाळी 6 ते 10 या वेळेत दसरा चौक, कोल्हापूर येथे राज्यस्तरीय अभिवादन सभेचा कार्यक्रम संपन्न होणार आहे.

या कार्यक्रमाची अध्यक्षता भारत मुक्ती मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष वामन मेश्राम हे करणार असून उद्घाटक म्हणून आंतरराष्ट्रीय कीर्तीचे लेखक डॉक्टर आनंद पाटील हे उपस्थित राहणार आहेत तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून डॉ.विलास खरात, प्रतापदादा पाटील, ऍड.राहुल मखरे , श्रीकांत दादा होवाळ तसेच सामाजिक व राजकीय क्षेत्रातील इतर अन्य मान्यवर महाराष्ट्रभरातून उपस्थित राहणार आहेत.
तरी राजर्षी छत्रपती शाहू महाराजांचे कार्य व विचार जाणून घेण्यासाठी बहुजन समाजातील बंधू भगिनींनी मोठ्या संख्येने सदर कार्यक्रमासाठी उपस्थित रहावे असे आवाहन कार्यक्रमाच्या संयोजन समितीच्या वतीने सागर सुतार, उत्तम पाटील, प्रशांत हावळ , शरद पाटील, कृष्णात पाटील, युवराज पाटील , प्रमोद हर्षवर्धन,महेश बावडेकर यांनी केले.

◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆



◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆