BANNER

The Janshakti News

चोपडेवाडी येथील श्री. लक्ष्मीदेवीच्या यात्रेला उद्या पासून प्रारंभ.. यात्रेनिमित्त भरगज्ज कार्यक्रामांची मेजवाणी..







चोपडेवाडी येथील श्री. लक्ष्मीदेवीच्या यात्रेला उद्या  पासून प्रारंभ..
 
यात्रेनिमित्त भरगज्ज कार्यक्रामांची मेजवाणी..

=====================================


=====================================

भिलवडी | दि. ५ मे २०२२

चोपडेवाडी (मानगाव ) ता .पलूस येथील श्री लक्ष्मी यात्रेचा प्रसंभ दि .६ . शुक्रवार पासून शुभारंभ होत आहे . कोरोनाच्या महामारी लाटेमध्ये गेली दोन वर्ष यात्रा रध्द झाली . परंतु यंदा यात्रा कमिटीच्या वतीने या यात्रेचे नेटके नियोजन करण्यात आले आहे . गेली दोन वर्ष यात्रा संपन्न झाली नसल्याने भक्तांच्यात उत्साचे वातावरण दिसून येत आहे . यंदाच्या यात्रे साठी भरगज्ज कार्यक्रामाची मेजवाणी यात्रा कमीटीने ठेवली आहे . यामध्ये सर्व गावकरी एक दिलाने सामील झाल्याची माहीती यात्रा कमिटीच्या वतीने चोपडेवाडी गावचे युवा नेते दिलीप माने ( सावकर ) यांनी दिली आहे.
 उद्या शुक्रवार दि. ६ मे. रोजी सकाळी ६ वाजता देवीचा अभिषेक सोहळा - दुपारी ३ .वा. देवीची गावातून भव्य मिरवणुक . रात्री ९ . वा ऑेर्केट्रा रॉयल कोल्हापूर यांचा कार्यक्रम होणार आहे.
शनिवार दि. ७ मे रोजी  सकाळी ७ वाजता - बैलगाडी शर्यत .जनरल ब गट प्रथम क्रमांक- ५०००/- ५ फुटी ढाल व निशाण, फेटा कै. शिवराम बापू यादव यांच्या स्मरणार्थ
द्वितीय क्रमांक- ३०००/- ३ फुटी ढाल व निशाण, फेटा हरी पाटील भाऊ यांचेकडून
तृतीय क्रमांक- २०००/- २ फुटी ढाल व निशाण, फेटा प्रशांत संभाजी माने (दादा) यांचेकडून
आदत घोडगाडी प्रथम क्रमांक- ५०००/- ५ फुटी ढाल व निशाण फेटा  सुनील केशव हारुगडे यांचेकडून महानिरीक्षक आजरा पोलीस ठाणे
द्वितीय क्रमांक- ३०००/- ३ फुटी ढाल व निशाण, फेटा  महादेव दशरथ तानगे यांचेकडून
ढाल सौजन्य अमित माने व आदित्य माने
तृतीय क्रमांक- २०००/- २ फुटी ढाल व निशाण, फेटा कै. लक्ष्मण ज्ञानू माने यांच्या स्मरणार्थ दिलीप माने ( सावकर ) यांच्याकडून घोडागाडी
प्रथम क्रमांक- ५०००/- ३ फुटी ढाल व निशाण फेटा श्री विनोद विष्णू जाधव (शेठ) द्वितीय क्रमांक- ३०००/-२ फुटी ढाल व निशाण फेटा महेश महादेव जाधव  सौजन्य . कै . शिवाजी आत्माराम गायकवाड .  तृतीय क्रमांक २०००/- १ फुटी डाल व निशाण फेटा सौजन्य  घनश्याम यशवंत यादव . सौजन्य राजकुमार गणपती माने आणि  रत्ना ज्वेलर्स दानोळी भारतीय मराठा महासंघाचे प्रमुख जसिंगपूर यांच्याकडून .१) प्रवेश फी १०% राहिल २) मैदान हे करेक्ट होणार ३) मैदान हे बिना काठी बिना बॅटरी होईल ४) दुखापत झाल्यास कमिटी जबाबदार राहणार नाही
रात्री ९ वाजता - तमाशा (सुनिता सुरेश कांडगावकर, कोल्हापूर )
हि यात्रा शांततेत व कायदा सुव्यवस्थेचे पालन करून पुर्ण केली जाईल यात्रे साठी भिलवडी पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक कैलास कोडग यांच्या मार्गदर्शनाखाली यात्रा कमीटी पार पाडणार आहे . आशी माहीती चोपडेवाडीचे युवा नेते दिलीप माने ( सावकर ) यांनी दिली आहे.

◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆



◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆