BANNER

The Janshakti News

ॲड. गुणरत्न सदावर्ते यांना २ दिवसांची पोलीस कोठडी व १०९ जणांना न्यायालयीन कोठडी..



ॲड. गुणरत्न सदावर्ते यांना २ दिवसांची पोलीस कोठडी व १०९ जणांना न्यायालयीन कोठडी..

=====================================


=====================================

मुंबई | दि. ९ एप्रिल २०२२

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांच्या मुंबई येथील निवासस्थानी काल एसटी कर्मचाऱ्यांनी आंदोलन केले होते. यावेळी संतप्त कर्मचाऱ्यांनी पवारांच्या निवासस्थानावर दगडफेक केली. त्यानंतर राज्यातील वातावरण मोठ्या प्रमाणात तापले होते. आझाद मैदानावर एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलना दरम्यान चेतावणीखोर भाषण केल्याबद्दल व सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी  ॲड. गुणरत्न सदावर्ते यांना काल संध्याकाळी मुंबई पोलिसांनी अटक केली. आज सकाळी सदावर्तेना मुंबईच्या किला कोर्टात हजर करण्यात आले होते. महेश वासनीस यांनी सदावर्तेची बाजू मांडली. 
राज्य सरकारच्यावतीने सरकारी वकीलांच्या वतीने  सदावर्तेंची १४ दिवासांच्या पोलीस कोठडीची मागणी करण्यात आली होती. याच पार्श्वभूमीवर राजकीय घमासनानंतर सदावर्ते यांच्यावरील सुनावणी पार पडली. यातच आता सदावर्ते यांना २ दिवसांची पोलिस कोठडी न्यायालयाने सुनावली आहे. तर, १०९  आरोपींना न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.
आझाद मैदानावर आंदोलनासाठी बसलेल्या एसटी कर्मचाऱ्यांनी काल अचानकपणे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या सिल्वर ओक येथील निवासस्थानाबाहेर आंदोलन केले. यानंतर राज्यभर तणावाचे वातावरण पसरले. कालच्या घटनेच्या विरोधात आज राष्ट्रवादीकडून राज्यभर आंदोलन केलं जात आहे. या हल्ल्यासाठी ॲड.सदावर्ते जबाबदार असल्याचा ठपका त्यांच्यावर आहे.
सरकारी वकिलांनी सुनावणीदरम्यान म्हटलं होतं की,ॲड. गुणरत्न सदावर्तेना १४ दिवसांची पोलिस कोठडी द्या, आरोपीवरील कलम गंभीर आहेत. त्यांनी कामगारांना भडकावलं आहे. आरोपांची संख्या मोठी असल्यानं त्यांची चौकशी कशी करणार? असं न्यायाधीशांनी म्हटलं. त्यावर बोलताना सरकारी वकील ॲड.प्रदीप घरत यांनी म्हटलं की, सीसीटीव्ही फुटेजेस आहेत. आरोपी क्रमांक १ सदावर्ते हेच यामागे एकटे नसून अजून काही जण त्यांच्यासोबत असणार म्हणून आम्हाला चौकशी करायची आहे. कोण कोण अक्टिव्हली यात इन्व्हॉल होतं यासंबंधी चौकशी करायची आहे.ॲड. सदावर्ते यांच्या भाषणामुळे कामगारांनी हे कृत्य केलंय. पोलिसांवर देखील हल्ला करण्यात आलाय. दगडफेक आणि चप्पलफेक करण्यात आलीय.  दोन जण जखमी झालेत. रक्ताचे नमूने घेतले आहेत. दारु पिऊन कामगार होते अशी शंका होती. काही जण आपलं नाव खोटं सांगतायत, सोबत पत्ता देखील सांगत नाहीत. यासाठी देखील चौकशी करायची आहे. ते खरंच एसटी कामगार आहेत की भाडोत्री होते. हे देखील चेक करायचंय. आज पहिली रिमांड आहे त्यामुळे या बेसिक गोष्टी माहिती हव्यात त्यामुळे रिमांडची मागणी करतो, असं घरत यांनी म्हटलं.
यावर बोलताना ॲड.सदावर्ते यांचे वकील म्हणाले की, गुणरत्न सदावर्ते पीएचडी आहेत. जयश्री पाटील ह्या देखील पीएचडी आहेत. मराठा आंदोलन सदावर्ते यांनी रद्दबातल केलं. सोबतच त्यावेळी त्यांच्यावर हल्ला करण्यात आला. सदावर्ते हे बार काऊन्सिलमध्ये देखील मोठ्या फरकाने विजयी झाले. सरकारच्या विरोधात मोठा आवाज सदावर्ते यांनी उठवला आहे. एसटी कर्मचाऱ्यांनी आत्महत्या केल्यात. कोणत्याही सत्ताधारी राज्यकर्त्यांनी त्यांना विचारलं नाही. एका सुपरस्टारच्या मुलाला अटक होते आणि सर्व त्यावर बोलायला लागतात, असं सदावर्ते यांचे ॲड.महेश वासवानी यांनी म्हटलं.

 ॲड.महेश वासवानी म्हणाले की, मराठा आरक्षणाविरोधात जयश्री पाटील यांनी याचिका केली त्याबद्दल युक्तीवाद सदावर्ते यांनी केला आहे. यामुळे त्यांना नेहमी चुकीची वागणूक दिली जायची. आज सादर केलेल्या एफआयआर मध्ये अनेक गोष्टी या मॉडीफाईड केल्या गेल्या आहेत. आम्ही मुंबईत आंदोलनाबाबत कुठेच नाही बोललो. आम्ही बारामतीत बोललोय आणि घुसून आंदोलन करा वगैरे आम्ही कुठेच बोललो नाही. कोणत्याच चॅनेलवर आम्ही असं बोललो नाही. घटनेवेळी देखील सदावर्ते तिथे नव्हते. ते मॅट कोर्टात होते. एका पत्रकाराने त्यांना विचारले की तुमची भूमिका काय तेव्हा त्यांनी शांततेचं आवाहन केलं होतं. ९२ हजार कर्मचाऱ्यांची केस होती. ते त्यात यशस्वी झालेत. आणि त्याचा राग म्हणून सरकार हे करतंय. सदावर्ते यांनी नेहमीच शांतता पाळा, असं सांगितलं होतं. आंदोलनावेळी देखील ते सातत्यानं हे म्हणत होते. जयश्री पाटील यांनी १०० कोटी रुपयांच्या अनिल देशमुखांच्या गैरव्यवहार प्रकरणी देखील दावा दाखल केला होता. सदावर्ते यांना ताब्यात घेताना नोटीस देखील देण्यात आली नाही. यातूनच सरकारचा रोष बघायला मिळत आहे. माझ्याकडे घटनास्थळीचे सीसीटीव्ही आहेत. मात्र कुठेही सदावर्ते नाहीत, असं सदावतेंच्या वकिलांनी म्हटलं आहे.
यावेळी यलो गेट पोलिस स्टेशनच्या प्रवेशद्वारावर तगडा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. कागदपत्रे पाहिल्यानंतर केवळ पोलीस कर्मचारी आणि इमिग्रेशन कार्यालयात येणाऱ्या लोकांना परवानगी आहे. अटक करण्यात आलेल्या १०४ महिला कर्मचाऱ्यांसह एसटी कर्मचाऱ्यांना आतमध्ये ठेवण्यात आले आहे. सुरक्षेचे कारण पाहता येथे मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.
काल हायकोर्टाच्या निर्णयानंतर काही एसटी आंदोलकांनी शरद पवार यांच्या घरावर दगडफेक आणि चप्पलफेक करत गोंधळ घातला होता. शरद पवार यांच्या घरावर हल्ला प्रकरणी गावदेवी पोलिसांनी ॲड.गुणरत्न सदावर्ते यांना अटक केली. शरद पवारांच्या घरावर हल्ला करणारे १०३ आंदोलकांनाही पोलिसांनी अटक केली होती.
ॲड. गुणरत्न सदावर्ते यांना रात्री अकरा वाजता अटक केल्यानंतर वैद्यकीय तपासणीसाठी आधी नायर आणि मग जेजे रुग्णालयात नेण्यात आले. सुमारे चार तास त्यांची मेडिकल जेजे मध्ये करण्यात आली. शरद पवार डर्टी पॉलिटिक्स करतात असा आरोप सदावर्तेच्या पत्नी ॲड.जयश्री पाटील यांनी केला आहे. गुणरत्न सदावर्तेची अटक बेकायदेशीर आहे असा दावाही त्यांनी केला आहे.

●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●


●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●



●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●