BANNER

The Janshakti News

" भारतीय विद्यार्थी मोर्चाचा " ११ व्या वर्धापन दिनानिमित्त सातारा जिल्हास्तरीय विशेष प्रबोधनाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात "कटगुण" येथे संपन्न..




" भारतीय विद्यार्थी मोर्चाचा " ११ व्या वर्धापन दिनानिमित्त सातारा जिल्हास्तरीय विशेष प्रबोधनाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात "कटगुण" येथे संपन्न..

==============================
==============================

सातारा | दि. १२ एप्रिल २०२२

राष्ट्रपिता महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीचे औचित्य साधून भारतीय विद्यार्थी मोर्चाची स्थापना करण्यात आली असून ११ एप्रिल २०२२ रोजी भारतीय विद्यार्थी मोर्चाचा ११ व्या  वर्धापन दिनानिमित्त सातारा महात्मा फुले यांची जयंती व जिल्हास्तरीय विशेष प्रबोधनाचा कार्यक्रम महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जन्मगावी खटाव तालुक्यातील "कटगुण" येथे मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
या कार्यक्रमाचे उद्घाटक मा.प्रा.लेफ्टनंट केशव पवार सर (छत्रपती शिवाजी काॅलेज सातारा) यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी त्यांनी  विद्यार्थ्यांना अत्यंत बहुमोलाचे मार्गदर्शन केले.    महात्मा फुले यांचे जीवन संघर्षाची प्रेरणा घेऊन विद्यार्थ्यांनी समाजकार्यात उतरावे असे आवाहन यावेळी बोलताना त्यांनी केले.




तसेच कार्यक्रमाचे अध्यक्ष मा.समीर मुजावर सर (राज्य प्रचारक,भारतीय विद्यार्थी मोर्चा महाराष्ट्र राज्य) यांनी विद्यार्थ्यांना संबोधित करताना म्हणाले की महापुरुषांच्या जयंती साजरी करण्यापेक्षा महापुरुषांचे अपुर्ण राहिलेले कार्य पूर्ण करण्यासाठी विद्यार्थ्यांनी पुढे यावे असे आवाहन त्यांनी बहुजन समाजातील विद्यार्थ्यांना केले.
या कार्यक्रमासाठी कार्यक्रमाचे वक्ते राज्य प्रवक्ता,भारतीय विद्यार्थी मोर्चा महाराष्ट्र राज्य मा.प्रथमेश ठोंबरे सर,मा.प्राचार्य मोहन शिर्के सर (कृषी  विद्यापीठ सातारा) यांच्या सह 
उपस्थित पदाधिकारी , जिल्हा उपाध्यक्ष किशोर खरात, खटाव तालुका प्रभारी मंगेश लोखंडे , माण तालुका संयोजक सनी भोसले , आशिष वीर, सुदर्शन खरात,एकनाथ वाघमोडे, अतुल खरात,इ.उपस्थित होते.
 बहुजन समाजातील महापुरुषांचे अपुर्ण कार्य पूर्ण करण्यासाठीच भारतीय विद्यार्थी मोर्चाची स्थापना करण्यात आली असून बहुजन समाजातील विद्यार्थ्यांनी भारतीय विद्यार्थी मोर्चा या राष्ट्रव्यापी संघटन मध्ये सहभागी होऊन महापुरुषांचे कार्य पूर्ण करण्यासाठी पुढे यावे असे आवाहन जिल्हा अध्यक्ष मा.चेतन आवडे यांनी बहुजन समाजातील विद्यार्थ्यांनी केले..!

●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●



●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●