BANNER

The Janshakti News

सुरेंद्र भैय्या वाळवेकर यांच्या प्रयत्नातून वसगडे गावाला विकासकामासाठी 32 लाख रुपयांचा निधी उपलब्ध..सुरेंद्र भैय्या वाळवेकर यांच्या प्रयत्नातून वसगडे गावाला विकासकामासाठी 32 लाख रुपयांचा निधी उपलब्ध.. 

======================================


======================================

भिलवडी |  दि. 08 एप्रिल 2022

                 पलूस तालुक्यातील वसगडे येथे जिल्हा परिषद सदस्य सुरेंद्र भैय्या वाळवेकर यांच्या प्रयत्नातून जनसुविधा व नागरी सुविधा योजनेअंतर्गत 32 लाख रु. रकमेचा निधी मंजूर करण्यात आला तर शरद भाऊ लाड यांच्या फंडातून पवार गल्ली येथे काँक्रीटीकरण 8 लाख रुपये निधी देण्यात आला ह्या कामाचे उदघाटन राष्ट्रवादी चे नेते व जि. प.सदस्य शरद भाऊ लाड , जिल्हा परिषद सदस्य मा.सुरेंद्र भैय्या वाळवेकर, मा. नितीनबाबा नवले, वसगडे गावचे सरपंच श्रेणिक पाटील, उपसरपंच संपतराव पवार यांच्या हस्ते करण्यात आले.
        जिल्हा परिषद सदस्य मा.सुरेंद्र भैय्या वाळवेकर म्हणाले वसगडे गावासाठी विकासकामांसाठी निधी कमी पडू देणार नाही आजपर्यंत वसगडे गावासाठी भरपूर निधी उपलब्ध करून दिला आहे इथून पुढे खासदार संजयकाका पाटील ,आमदार अरुण अण्णा लाड यांच्या फंडातून विकासकामे पूर्ण केली जातील.त्यामुळे वसगडे गावाने गावच्या विकासाची चिंता करू नये.
     यावेळी शरद भाऊ लाड म्हणाले  जिल्हा परिषद सदस्य मा.सुरेंद्र भैय्या वाळवेकर व मा. नितीनबाबा नवले हे माझे खूप जवळचे मित्र.आहेत त्यामुळे त्यांना विकासकामांसाठी निधी कमी पडू देणार नाही  भिलवडी गट व अंकलखोप गट  यामध्ये जेवढा लागेल तेवढा निधी दिला जाईल आशा भावना लाड यांनी व्यक्त केल्या ह्या वक्तव्यामुळे भिलवडी जिल्हा परिषद गटात हा चर्चेचा विषय ठरला आहे 


       यावेळी जवाहर पाटील,आबा डिसले,तंटामुक्ती अध्यक्ष नामदेव जाधव,जंनगोंडा पाटील (मुंबई),ग्रामपंचायत सदस्य शिवाजी कोळी,सोनार बापू,संजय खान,संजय पाटील उपस्थित होते.

●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●


●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●
●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●