BANNER

The Janshakti News

माजी नगरसेवक वैभव पवारच्या अटकेसाठी दलित महासंघाचे धरणे आंदोलन..



माजी नगरसेवक वैभव पवारच्या अटकेसाठी दलित महासंघाचे धरणे आंदोलन.. 

======================================


======================================

इस्लामपूर | ता. ०४/०४/२०२२

 सामाजिक कार्यकर्ते सदानंद केशव चांदणे रा.इस्लामपूर यांना जातीवाचक शिवीगाळ केल्याप्रकरणी एम.डी.पवार बँकेचे संचालक माजी नगरसेवक वैभव पवार यांना अटक करा या मागणीसाठी दलित महासंघाच्या वतीने संस्थापक अध्यक्ष प्रा.मधुकर वायदंडे यांच्या नेतृत्वखाली  इस्लामपूर तहसिल कार्यालयासमोर बेमुदत धरणे आंदोलन सुरु करण्यात आले आहे.
           तहसीलदार श्री.उबाळे यांच्याशी झालेल्या चर्चेत कोणताही  ठोस निर्णय न झालेने सदर बेमुदत धरणे आंदोलन चालूच ठेवणार असल्याचे प्रा.मधुकर वायदंडे यांनी सांगितले.
            निवेदनात म्हटले आहे वैभव पवार व त्यांच्या साथीदारांवर  ॲट्रॉसिटी कायद्यांतर्गत इस्लामपूर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद आहे.
             सर्वसामान्यांच्या हितासाठी व उन्नतीसाठी बँका असतात सहकार क्षेत्रामध्ये कार्यरत असणाऱ्या बँकेचे संचालक बँकांचे नियम धाब्यावर बसवून मनमानी कारभार करत असल्याचे निदर्शनास येत आहे कर्जदारांना धमकावणे,अर्वाच्य शिवीगाळ करणे,कर्जाच्या परतफेडीची मुदत असतानाही अरेरावीची भाषा करून कर्ज वसुलीसाठी तगादा लावणे असे प्रकार वारंवार घडत आहेत भीतीपोटी लोक तक्रार करत नाहीत त्याचा गैरफायदा घेऊन काही मग्रूर संचालक दलित मागासवर्गीयांची गळचेपी करत आहे दलित महासंघ या गोष्टीचा जाहीर निषेध करत असून.. 

सदानंद चांदणे यांच्या प्रकरणाची दखल घेऊन वैभव व त्याच्या साथीदारांना तात्काळ अटक करण्यात यावी अन्यथा त्यांना फरारी घोषित करण्यात यावे.
      अनुसूचित जाती-जमाती प्रतिबंधक कायद्याची अंमलबजावणी करण्यात यावी व आरोपी पळून जाण्याची संधी न देता त्यांना अटक करावी अशा मागण्यांचे निवेदन देण्यात आले आहे. 
     सदर मागण्यांची पूर्तता न झालेस आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा प्रा.मधुकर वायदंडे यांनी दिला आहे. 


आंदोलनामध्ये राज्य उपाध्यक्ष पोपटराव लोंढे,प.महा.कार्याध्यक्ष शशिकांत नांगरे,युवक आघाडी अध्यक्ष सुधाकर वायदंडे,प.महा.निरीक्षक अनिल आवळे,कोल्हापूर जि.अध्यक्ष सुहास कांबळे,सदाभाऊ चांदणे,सुवर्णा,चिकुर्डेकर,जि.संघटक दिनकर नांगरे,तालुकाध्यक्ष संभाजी मस्के,भारती शिंदे,राजू मुल्ला,टारझन पवार,राकेश काळे यांच्यासह मोठया प्रमाणात लोक उपस्थित होते.

◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆


◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆



◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆