BANNER

The Janshakti News

रयत शेतकरी संघटनेचे प्रदेश सरचिटणीस मा. सुनिल भाऊ ठोसर यांचा वाढदिवस ७ एप्रिल रोजी विविध सामाजिक उपक्रमांनी होणार साजरा...रयत शेतकरी संघटनेचे प्रदेश सरचिटणीस  मा. सुनिल भाऊ ठोसर यांचा वाढदिवस ७ एप्रिल रोजी विविध सामाजिक उपक्रमांनी होणार साजरा...

======================================
======================================

बिड | दि. ०४/०४/२०२२
बिड जिल्हा प्रतिनिधी - बाळराजे जाधव

सर्व सामान्य जनतेला उपयुक्त होईल अशा सामाजिक उपक्रमातून मा. सुनील भाऊ ठोसर यांचा वाढदिवस मित्र परिवाराच्या वतीने सहारा बालग्राम येथे साजरा करण्यात येणार आहे. वाढदिवस थाटामाटात न करता  गोरगरिब लोकांना अत्यावश्यक साहित्य वाटप करून वाढदिवस साजरा करण्याचा निर्णय मा.सुनील भाऊ ठोसर यांनी घेतला आहे.
सर्व सामान्य माणसाच्या आयुष्यात अनेक काही अडचणी येत राहात असतात, अशा अडचणीच्या काळात गोरगरीब जनतेच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहून त्यांच्या अडचणी दूर करण्यासाठी  निर्भिडपणे लढा देण्याचे काम मा.सुनील भाऊ ठोसर हे करीत आहेत. तळागाळातील गोरगरीब, दिव्यांग,वृध्द व सामान्य जनतेला आजपर्यंत त्यांनी भरपूर मोठ्या प्रमाणात मदत केली आहे. अशा या गोरगरीब लोकांचा आशिर्वाद पाठिशी घेऊन ते आपले सामाजिककार्य करीत राहिले..
यामुळेच त्यांनी आपल्या स्वतः चा वाढदिवस सामाजिक उपक्रमातून  साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे.

सहारा बालग्राम व वृध्दाश्रम, येथे गरिब मुलांना, शालेय साहित्य, किराणा, कपडे, धान्य, अशा अनेक साहित्यांचे वाटप करून  सहारा बालग्राम येथे वाढदिवस साजरा करण्यात येणार आहे..
सर्व मित्र परिवार, पदाधिकारी यांनी आपल्या आपल्या परिसरातील अनाथ मुलांसाठी, दिव्यांग शाळेत, गोशाळा येथे, वृद्ध आश्रम, निराधार आदी प्रकल्प येथे जाऊन आपल्या येथोपरी सहकार्य करावे व माझी काही मदत लागल्यास  9405799999 या नंबर वर एसएमएस करावे असे आवाहन रयत शेतकरी संघटनेचे प्रदेश सरचिटणीस मा. सुनील ठोसर यांनी केले आहे. 

◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆

◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆

◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆