BANNER

The Janshakti News

सांगली जिल्ह्यातील समाजकल्याणच्या योजनांना विशेष निधी द्या..... संदेश भंडारे .......बार्टीचे महासंचालक धम्मज्योती गजभिये यांना साकडे.....

सांगली जिल्ह्यातील समाजकल्याणच्या योजनांना विशेष निधी द्या...................... संदेश भंडारे

बार्टीचे महासंचालक धम्मज्योती गजभिये यांना साकडे.....

==============================
==============================

तासगाव | ता. ५ एप्रिल २०२२

सांगली जिल्ह्यातील समाजकल्याण विभागाच्या कल्याणकारी योजनांना विशेष निधी देऊन घरकुल, संविधान भवन, युवा बचत गट व बेरोजगार युवकांचे उद्योगाना गतिमान करण्यासाठी मागणी जिल्हा दक्षता व नियंत्रण समितीचे सदस्य तथा रिपाईचे लोकसभा जिल्हाध्यक्ष संदेशभाऊ भंडारे यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था बार्टी चे महासंचालक धम्मज्योती गजभिये यांच्याकडे केली.

पुणे येथील बार्टीच्या मुख्यालयात झालेल्या बैठकीत सांगली जिल्हा परिषदेचे समाज कल्याण अधिकारी बाळासाहेब कामत उपस्थित होते.

यावेळी बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था बार्टी पुणेचे महासंचालक धम्मज्योती गजभिये यांची भेट घेऊन जिल्ह्यातील ओबीसी, अनुसूचित जाती जमाती आणि आर्थिकदृष्ठ्या दुर्बल घटकातील गरीब विध्यार्थी, स्कॉलरशिप योजना याबाबत चर्चा करण्यात आली.

रिपाईचे लोकसभा जिल्हाध्यक्ष संदेशभाऊ भंडारे यांनी जातपडताळणी बाबत च्या अडचणी सांगून विविध समस्यांचे पाढे वाचले. तसेच युवा बचत गटांच्या माध्यमातून उद्योग निर्मिती साठी योजना राबवण्याची विनंती केली, बेरोजगार युवकांना सक्षम करण्यासाठी राज्य व केंद्रातील योजना अमलात याव्यात यासाठी प्रयत्न व्हावेत अशी मागणी केली.

समाजकल्याण अधिकारी बाळासाहेब कामत यांनी राज्यशासना कडून संविधान सभागृहाची योजना जलदगतीने सुरु करावी यासाठी प्रशासनाने प्रयत्न सुरु करावेत अशी मागणी केली.

यावेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था बार्टी पुणेचे महासंचालक धम्मज्योती गजभिये यांनी एप्रिल महिन्यात सांगली जिल्ह्यातील बेरोजगार युवकांच्यासाठी महामेळावा घेण्यात येईल आणि समाजकल्याण व बार्टी मार्फत जास्तीत जास्त सहकार्य करण्याचे आश्वासन दिले.

यावेळी प्रथमेश कांबळे, सरचिटणीस प्रविण मोरे, सिद्धार्थ कांबळे, जनसंपर्क अधिकारी बाळासाहेब वाडकर उपस्थित होते.

●●●●◆●●●●◆●●●●◆●●●●◆●●●●◆●●●●◆●●●●


●●●●◆●●●●◆●●●●◆●●●●◆●●●●◆●●●●◆●●●●●●●●◆●●●●◆●●●●◆●●●●◆●●●●◆●●●●◆●●●●