yuva MAharashtra अंखलखोप पलूस येथील युवकांचा महाराष्ट्र नवनिर्माण सेना मध्ये पक्ष प्रवेश..

अंखलखोप पलूस येथील युवकांचा महाराष्ट्र नवनिर्माण सेना मध्ये पक्ष प्रवेश..



अंखलखोप पलूस येथील युवकांचा महाराष्ट्र नवनिर्माण सेना मध्ये पक्ष प्रवेश..

-------------------------------------------------------------------
         सामान्य जनतेचा बुलंद आवाज.....!
         संपादक - भाऊसाहेब रुपटक्के.
-------------------------------------------------------------------

अंखलखोप | दि. 06/02/2022

आज अंखलखोप, तालुका पलूस येथील शिव प्रकाशनगर येथील युवकांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज साहेब ठाकरे यांच्या विचारांना प्रेरित होवून व त्यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमध्ये पक्ष प्रवेश केला. 


यावेळी महेश शिंदे म्हणाले की, अंखलखोप गावामध्ये राजकारणाचा फार विचका झालेला आहे. आपल्या अंकलखोप गावात जनतेचे प्रश्न मांडण्यासाठी सक्षम विरोधी पक्ष नाही. महाराष्ट्र नवनिर्माण सेना यापुढे विरोधी पक्षाची भूमिका सक्षमपणे पार पाडेल व नागरीकांचे प्रश्न प्रशासनापुढे मांडून ते सोडवणार.


महाराष्ट्र नवनिर्माण सेना हा फक्त पक्ष नसून एक कुटुंब आहे. आज तुम्हीं महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज साहेब ठाकरे यांच्यावर जो विश्वास दाखवला आहे या विश्वासास आम्ही पात्र ठरू. तुम्हाला लागेल ती मदत केली जाईल. महाराष्ट्र नवनिर्माण सेना पलूस तालुक्यामध्ये एक सक्षम विरोधी पक्षाची भूमिका निभावत आहे व नागरीकांचे प्रश्न सोडवत आहे तुमच्याही अडीअडचणी सोडवू असे सागर सुतार म्हणाले.
यावेळी ज्येष्ठ महाराष्ट्र सैनिक दिलीप सूर्यवंशी, अंकुश कुऱ्हाडे, बाबसो कुऱ्हाडे अमृत कुऱ्हाडे, सचिन कुऱ्हाडे, अनिकेत माने व स्थानिक नागरिक उपस्थित होते.



◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆



◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆