BANNER

The Janshakti News

लवकरच वाजणार जिल्हा परिषदा व पंचायत समितीच्या निवडणुकीचे बिगुल............................ महाराष्ट्रातील २५ जिल्हा परिषदा व त्याअंतर्गत २८४ पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणूका प्रारुप प्रभाग रचना 08 ते 14 फेब्रुवारी पर्यंत होणार...



लवकरच वाजणार जिल्हा परिषदा व पंचायत समितीच्या निवडणुकीचे बिगुल...

महाराष्ट्रातील २५ जिल्हा परिषदा व त्याअंतर्गत २८४ पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणूका प्रारुप प्रभाग रचना 08 ते 14 फेब्रुवारी पर्यंत होणार...

--------------------------------------------------------------------
      सामान्य जनतेचा बुलंद आवाज....!
      संपादक - भाऊसाहेेेब रुपटक्के.
--------------------------------------------------------------------
 
सांगली | दि.07/02/2022

राज्यातील २५ जिल्हा परिषदा व त्याअंतर्गत २८४ पंचायत समित्यांची प्रारुप प्रभाग रचना 08 ते 14 फेब्रुवारी पर्यंत तयार करण्यासाठी आयोगाच्या दि. ०२/०२/२०२२ च्या पत्रान्वये सर्व जिल्हा अधिकारी यांना सूचना देण्यात आल्या आहेत.

रायगड , रत्नागिरी , सिंधुदुर्ग 08/02/2022 , नाशिक , जळगाव , अहमदनगर 09/02/2022 , पुणे , सातारा 10/02/2022 , सांगली , सोलापूर , कोल्हापूर 11/02/2022 , औरंगाबाद , जालना , परभणी , हिंगोली , बीड , नांदेड उस्मानाबाद , लातूर 12/02/2022 , अमरावती , बुलढाणा , यवतमाळ , 13/02/2022 , चंद्रपूर , वर्धा , गडचिरोली 14/02/2022

प्रारुप प्रभाग रचनेच्या आरखड्याचे कामकाज हाताळणारे उप जिल्हाधिकारी व संबंधित तहसिलदार यांनी प्रारुप प्रभाग रचनेचा कच्चा आराखडा तपासणीकरिता संबंधित आदेशामध्ये सूचित केलेल्या दिनांकास आयोगाच्या कार्यालयात सकाळी १०.३० वाजता उपस्थित राहण्याच्या सूचना देण्यात आले आहेत. तसेच प्रारुप प्रभाग रचनेचा कच्चा आराखडा तपासणी करण्यासाठी आयोगाने सुचित केलेल्या दिनांकास संबधित सर्व कागदपत्रे सोबत घेऊन येण्याच्या सुचना संबंधित अधिकारी यांना मा. राज्य निवडणूक आयुक्त यांनी दिले आहेत.

◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆



◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆