BANNER

The Janshakti News

सर्वात मोठी बातमी - राज्याचे शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू यांना दोन महिन्यांच्या सश्रम कारावासाची शिक्षा...

राज्याचे शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू यांना दोन महिन्यांच्या सश्रम कारावासाची शिक्षा... 
-----------------------------------------------------


-----------------------------------------------------

अमरावती / दि. ११/०२/२०२२

राज्याच्या राजकीय क्षेत्रातून एक मोठी बातमी समोर आली आहे. अकोला जिल्ह्याचे पालकमंत्री तथा महिला बालकल्याण व शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू यांना दोन महिन्यांच्या सश्रम कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. याशिवाय त्यांना २५ हजार रुपयांचा दंडही ठोठवण्यात आला आहे. शिक्षणमंत्री बच्चु कडू यांच्यावर सन २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत प्रतिज्ञापत्र सादर करताना मुंबईतील फ्लॅटची माहिती लपवल्याचा ठपका ठेवण्यात आला. चांदूरबाजार प्रथमवर्ग न्यायालयाने हा निर्णय दिला आहे.२०१४ विधानसभा निवडणुकीवेळी बच्चू कडू यांनी निवडणूक आयोगाला आपल्या संपत्तीची माहिती देणारं प्रतिज्ञापत्र सादर केलं होतं. या प्रतिज्ञापत्रात त्यांनी मुंबईतील फ्लॅटची कोणतीही माहिती दिली नव्हती. २०१७ मध्ये बच्चू कडू यांच्याविरोधात अमरावतीतील भाजपचे नगरसेवक गोपाल तिरमारे यांनी तक्रार केली होती. या खटल्यात चांदूरबाजार प्रथमवर्ग न्यायालयाने हा निकाल दिला आहे.

◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆

◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆