BANNER

The Janshakti News

*मातीची भांडी उत्तम-*


               ----मातीची  भांंडी उत्तम----

_____________________________________

_____________________________________

                                      दि.12/02/2022
आरोग्य ,

              --- मातीची भांडी उत्तम ---

ॲल्युमिनिअममधील अन्न हे शरीरासाठी हानिकारक आहे. आधुनिक जीवनशैलीमुळे मातीची भांडी हळूहळू हद्दपार झाली. मात्र गेल्या काही वर्षांपासून मेट्रो शहरांमध्ये पुन्हा एकदा दिसू लागली आहेत. जुनी जाणती मंडळी आज देखील मातीच्या भांड्यात जेवण बनवणं पसंद करत आहेत. आयुर्वेदात असं म्हणनं आहे की, आगीवर हळूहळू जेवणं शिजणं शरीरासाठी हितकारक आहे.

 मातीचे भांडेच का? 

असं म्हटलं जात की मातीच्या तव्यावर पोळी बनवल्याने त्यामधील एकही पोषकतत्व नष्ट होत नाही. ॲल्युमिनियमच्या भांड्यात पदार्थ बनवल्याने त्यातील ८७ टक्के पोषकतत्वे कमी होतात. पितळेच्या भांड्यात पदार्थ बनवल्याने ७ टक्के पोषकतत्वे कमी होतात(पितळेचे भांडे कल्हई केलेले असावे). केवळ मातीच्या भांड्यात बनवलेल्या पदार्थांमध्ये १०० टक्के पोषकतत्वे कायम राहतात.

 मातीच्या भांड्यात जेवण करणे सोईचे

मातीच्या भांड्यात वरण 25 मिनिटाच्या आत हळू आचेवर शिजून जात. म्हणून वरणाला नेहमी मातीच्या भांड्यात शिजवायला ठेवून तुम्ही तुमचे बाकीचे काम करू शकता. एक वेळा मातीच्या भांड्यातील शिजलेले वरण जर तुम्ही खाल्ले तर ते एवढे स्वादिष्ट आणि पौष्टिक असत की तुम्ही त्याची चव विसरू शकत नाही. याच प्रमाणे मातीच्या तव्यावर बनलेली पोळी व माठाचे पाणी फक्त स्वादिष्टच नसत तर ते जन्मभर तुम्हाला निरोगी ठेवतं.

 स्वादिष्ट आणि पौष्टिक
 
मातीच्या तव्यावर जेवण अधिक पौष्टिक आणि स्वादिष्ट होतं. मातीचे तत्व पोळ्यांमध्ये शोषले जाते यामुळे त्याची पौष्टिकता अधिक वाढते. 

 बद्धकोष्ठतेपासून सुटका

सध्याच्या धावपळीच्या जीवनशैलीमुळे बद्धकोष्ठतेची समस्या साधारण झालीये. ज्यांना बद्धकोष्ठतेचा त्रास होतोय त्यांनी मातीच्या तव्यावर बनवलेली पोळी खाल्ल्याने त्रास दूर व्हायला मदत होते.


◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆



◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆