BANNER

The Janshakti News

राजस्व शब्दलळा मंच आयोजित ' शब्दधारा ' पुस्तकाचे प्रकाशन सोहळा संपन्न.....



राजस्व शब्दलळा मंच आयोजित ' शब्दधारा ' पुस्तकाचे प्रकाशन सोहळा संपन्न..... 
 

------------------------------------------------------------------

                 सामान्य जनतेचा बुलंद आवाज....!
संपादक - भाऊसाहेब रुपटक्के

--------------------------------------------------------------------

 सोलापूर | दि. १९/०१/२०२२
(आशा रणखांबे)

         महाराष्ट्र शासनाच्या महसुल विभागातील आपापल्या कामांचा व्याप सांभाळीत जे साहित्य सेवा करतात त्यांचा राजस्व शब्दलळा मंच या समुहाचा शब्दधारा ' प्रातिनिधीक कविता संग्रह दिनकर ठाकरे यांच्या शुभ हस्ते प्रकाशन करण्यात आले . प्रकाश कवडे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमाचे प्रस्ताविक राजस्व शब्दलळा मंच , महाराष्ट्र राज्याचे समुह प्रशासक राजेश चौरपगार , अमरावती  यानी केले व शब्दलळा मंच स्थापनेचा ऊद्देश ही आपल्या प्रास्तविकात नमुद केले .
          या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी बार्शीचे ज्येष्ठ साहित्यिक शब्बीर मुलाणी , श्रीकांत कवळे नायब तहसिलदार , कोकण भवन आणि पुस्तकाचे प्रकाशक श्यामभाऊ चौकुडे  होते . प्रमुख अतिथी विनोदभाऊ अढाऊ यानी ' शब्दधारा ' या पुस्तकाचे अभ्यासपुर्ण विश्लेशन केले आणि कौतुक ही केले . यावेळी  बोलतांना अढाऊ  म्हणाले,   ' शब्दांच्या धारेतच वंचितांचे दु: ख दुर करण्याची धार असते . त्यासाठी साहित्यिकांची उक्ती आणि कृती एक असेल तरच शब्दातील धारेला किंमत येईल अन्यथा नाही .
       किशोर जराड यानी ' साहित्य आणि महसुल खात्यात साहित्य निर्मिति होणे ही महत्वाची गोष्ट आहे . महाराष्ट्र शासनाच्या महसुल परिवारात लेखन करणारा मोठा वर्ग आहे . आणि तो वर्ग  ' राजस्व शब्दलळा मंच ' च्या व्यासपिठावर येणे . हिच गोष्ट अभिमानास्पद असल्याचे प्रतिपादन यावेळी बोलताना किशोर जराड यानी केले तर  ज्येष्ठ साहित्यिक शब्बीर मुलाणी यांनी  ' शब्दधारा ' हा कविता संग्रह सामाजिक भान ठेवणारा , वंचिताला न्याय देणारा असल्याने तो बहुचर्चित राहील असे स्पष्ठ केले .
           
           यावेळी स्वरांजली ग्राफिक्स लिमिटेड , अमरावतीचे संचालक श्यामराव चौकुडे यानी ' ई ' बुक काळाची गरज असल्याचे मनोगत व्यक्त केले . कार्यक्रमाचे सुत्रसंचालन राजेश  केले तर अक्षय खानापुरकर यानी उपस्थितांचे आभार मानले . कार्यक्रमाच्या यशस्वीकरिता विजय धर्मसारे , रोजी कापसे  , प्रियंका येईलवाड यांनी परिश्रम घेतले.
                   राजस्व शब्दलळा मंच, अमरावती  यांच्या वतीने प्रकाशीत केलेल्या या कविता संग्रहाचे संपादन राजेश चौरपगार , श्रीकांत कवळे , अविनाश पोटदुखे , प्रविणकुमार ढोले , किशोर जराड आणि डॉ.वैशाली वाघमोडे- शेंडगे यानी केले .  शब्बीर मुलाणी यांची विस्तृत प्रस्तावना या कविता संग्रहास लाभली आहे .

◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆




◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆