BANNER

The Janshakti News

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाकडून स्वर्णिय भारताकडे...स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाकडून स्वर्णिय भारताकडे...
 
-------------------------------------------------------------------
         सामान्य जनतेचा बुलंद आवाज....!
संपादक - भाऊसाहेब रुपटक्के.
--------------------------------------------------------------------

भिलवडी | दि.22/01/2022

भिलवडी तालुका पलुस येथे 20 जाने 2022 रोजी सकाळी 10:30 वाजता डायमंड हॉल, शांतीवन अबू रोड आयोजित 'आजादी के अमृत मोहत्सव स्वर्णिय भारत की और प्रोजेक्ट चा उदघाटन सोहळा (ऑनलाईन) संपन्न झाला.

प्रजापिता ब्रह्मा बाबांच्या 53 व्या अव्यक्त दीना दिवशी प्रोजेक्ट चे उदघाटन भारताचे पंतप्रधान मा. नरेंद्र मोदीजी यांचे शुभ हस्ते झाले. या कार्यक्रमाचे नियोजन भिलवडी सेवा केंद्राच्या संचालिका आदरणीय मीरा बहेनजी यांनी केले. कार्यक्रमाला मा. गिरीश चितळे (चितळे उद्योग सहमुहाचे संचालक, भिलवडी शिक्षण संस्थेचे संचालक, जायंट्स ग्रुप संचालक) मा. श्रीधर वाळवेकर (तात्या) (माजी चेअरमन दक्षिण भाग सोसायटी) मा. माशामराव आप्पा पाटील (माजी संचालक सांगली सह साखर कारखाना) डॉ. सुधा चोपडे , बेबीताई पाटील आदी मान्यवर उपस्थित होते. यांचा सन्मान करण्यात आला.

वर्षभर चालणाऱ्या या कार्यक्रमाचे नियोजन करून हा उपक्रम उत्कृष्ठ पणे पार पाडण्याची हमी भिलवडी सेवा केंद्राच्या संचालिका आदरणीय मीरा बहेनजी यांनी दिली.  भिलवडीतील सर्व ग्रामस्थ सेवा केंद्रातील भाई माता यांच्या उपस्थितीत जानकी हॉल भिलवडी या ठिकाणी संपन्न झाला.

◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆

◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆