BANNER

The Janshakti News

पुणे येथून सकाळची एस आय आय एल सी या संस्थेचे चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर स्किलिंग & एज्युकेशन श्री निनाद पानसे आणि श्री जयप्रकाश कुलकर्णी प्रोजेक्ट मॅनेजर यांची बाबासाहेब चितळे महाविद्यालय आणि भिलवडी शिक्षण संस्थेच्या सर्व विभागांना भेट....





पुणे येथून सकाळची एस आय आय एल सी या संस्थेचे चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर स्किलिंग & एज्युकेशन श्री निनाद पानसे आणि श्री जयप्रकाश कुलकर्णी प्रोजेक्ट मॅंंनेजर यांची बाबासाहेब चितळे महाविद्यालय आणि भिलवडी शिक्षण संस्थेच्या सर्व विभागांना भेट....

--------------------------------------------------------------------
सामान्य जनतेचा बुलंद आवाज....!
संपादक - भाऊसाहेब रुपटक्के
--------------------------------------------------------------------

भिलवडी | दि. 20/01/2022

आज दिनांक 20 जानेवारी 2022 रोजी पुणे येथून सकाळची एस आय आय एल सी या संस्थेचे चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर स्किलिंग & एज्युकेशन श्री निनाद पानसे आणि श्री जयप्रकाश कुलकर्णी प्रोजेक्ट मॅनेजर एस आय आय एल सी सकाळ यांनी बाबासाहेब चितळे महाविद्यालय आणि भिलवडी शिक्षण संस्थेच्या सर्व विभागांना भेट दिली .


पहिलीपासून महाविद्यालयापर्यंत सर्व वर्गांना नव्या पद्धतीचे उत्तम ट्रेनिंग आणि योग्य शिक्षण कसे देता येईल , त्याच प्रमाणे इयत्ता पाचवी सहावी पासूनच विद्यार्थ्यांच्या मनामध्ये करियर निर्माण करण्यास संदर्भाने योग्य त्या संकल्पना कशा तयार होतील या संदर्भाने भिलवडी शिक्षण संस्थेला नवे उपक्रम , एका छताखाली अनेक शाखांचे अभ्यासक्रम सहज उपलब्ध करून देण्याचे आश्वासन यावेळी श्री निनाद पानसे सरांनी दिले . जयप्रकाश कुलकर्णींनी देखील संस्थेला केजी ते पीजी लागणारी सर्व शैक्षणिक उपक्रम सुरू करण्यासाठी मदत आणि मार्गदर्शन करण्याचे आश्वासन दिले .

यावेळी भिलवडी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष सन्माननीय श्री विश्वास चितळे , सचिव श्री मानसिंग हाके तसेच सहसचिव श्री के डी पाटील , माजी सचिव श्री एस एन कुलकर्णी सर्व विभाग प्रमुख प्राचार्य आणि सेवक उपस्थित होते . 

यावेळेला माननीय श्री विश्वास चितळे यांनी असे आवाहन केले की जागतिक स्पर्धेत टिकण्यासाठी मोठ्या शहरांमध्ये जे उपलब्ध होते ते आपण आपल्या संस्थे मध्ये उपलब्ध आणून देण्यासाठी श्री पानसे , सकाळ आणि एस आय आय एल सी अशा मान्यवर संस्थेचे आपण योग्य पद्धतीने मदत घेऊन आपल्या विद्यार्थ्यांना उत्तम सुविधा उपलब्ध करून द्याव्यात .
यावेळी सचिव श्री हाके सरांनी सर्व विभागांच्या वतीने आम्ही सर्वजण श्री पानसे साहेब आणि एस आय एल सी या सकाळच्या संस्थेशी लवकरात लवकर योग्य पद्धत योग्य पद्धतीने बांधले जाऊ असे आश्वासन दिले .



◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆



◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆