BANNER

The Janshakti News

धक्कादायक घटना.... माळवाडी येथील मुली सोबत प्रेम संबंध ठेवणाऱ्या मुलाला मुलीच्या वडिलांनी व नातेवाईकाने मारहाण केल्यामुळे खंडोबाचीवाडी येथील मुलाने केली आत्महत्या... भिलवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल...धक्कादायक घटना....

 माळवाडी येथील मुली सोबत प्रेम संबंध ठेवणाऱ्या मुलाला  मुलीच्या वडिलांनी व नातेवाईकाने मारहाण केल्यामुळे खंडोबाचीवाडी येथील मुलाने केली आत्महत्या...

 भिलवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल...
---------------------------------------------------------------------

संपादक - भाऊसाहेब रुपटक्के
----------------------------------------------------------------------

भिलवडी | दि. २९ डिसेंबर २०२१

माळवाडी तालुका पलूस येथील एका मुली सोबत खंडोबाचीवाडी येथील एका मुलाचे प्रेम संबंध असले कारणांमुळे मुलीच्या वडिलांनी व नातेवाईकांनी मुली सोबत प्रेम संबंध ठेवणाऱ्या मुलाला मारहाण केल्यामुळे खंडोबाचीवाडी येथील मुलाने आत्महत्या केल्याची घटना नुकतीच घडली आहे.

 फिर्यादी अनिल भगवान मगदुम रा. खंडोबाचीवाडी यांनी त्याचा मुलगा इंद्रजित तसेच माळवाडी येथील मुलगी यांचेत या दोघांच्या प्रेमसंबंधा वरून मुलीचे वडील रकमाजी सिताराम गायकवाड रा.माळवाडी तसेच त्यांचे पाहूणे ऋषिकेश जिवन तुपारे रा. सांगलीवाडी यांनी मुलगा इंद्रजित यास धक्काबुक्की शिवीगाळ करून तुझी लायकी आहे का आमचे मुलगी सोबत लग्न करायची असे अपमानास्पद बोलून तु जिव दिलास तर आम्हाला काही फरक पडत नाही अशी अपप्रेरणा देवून येथून हाकलून दिल्याने फिर्यादी यांचा मुलगा इंद्रजित याने सदर कारणा वरुनच कोणतेतरी विषारी औषध पिवून आत्महत्या केली असून फिर्यादी यांचे मुलास १) रकमाजी सिताराम गायकवाड रा. माळवाडी २) ऋषिकेश जिवन तुपारे रा. सांगलीवाडी यांनी आत्महत्या करणेस चिथावणी दिली असून ते त्याचे मरणास कारणीभूत आहेत अशी तक्रार दिल्याने यातील आरोपी यांचेवर भिलवडी पोलीस ठाणेस गुन्हा दाखल केला असुन गुन्हयाचा पुढील तपास सपोनि कोडग सो. करीत आहेत.

●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●