BANNER

The Janshakti News

मा.सौ,समिना रज्जाक कोरबी यांची उपसरपंच पदी बिनविरोध निवड......

 


मा.सौ,समिना रज्जाक कोरबी यांची  उपसरपंच पदी बिनविरोध निवड......

--------------------------------------------------------------------

संपादक - भाऊसाहेब रुपटक्के
--------------------------------------------------------------------


नागठाणे | दि. ३० डिसेंबर २०२१

 नागठाणे तालुका पलूस भागात महत्त्वाची समजली जाणाऱ्या नागठाणे गावच्या ग्रामपंचायतीचे उपसरपंच सचिन देसाई यांनी राजीनामा दिल्यामुळे रिक्त झालेल्या पदावर मा.सौ,समिना रज्जाक कोरबी यांची बिनविरोध उपसरपंच पदी निवड करण्यात आली.


अशी माहिती निवडणूक अधिकारी एस,आर,पाटील                यांनी दिली. सरपंच जगन्नाथ थोराय यांच्या अध्यक्षतेखाली आणि निवडणूक अधिकारी म्हणून ग्रामसेवक एस,आर,पाटील  यांनी काम पाहिले. या प्रसंगी मा.सौ,समिना रज्जाक कोरबी यांचा एकमेव अर्ज आल्याने निवड बिनविरोध झाल्याचे जहिर करण्यात आले. याप्रसंगी
नागठाणे गावचे विध्यमान सरपंच जगन्नाथ थोरात,माजी उपसरपंच सचिन देसाई, नागठाणे ग्रामपंचायतचे सर्व  सदस्य उपस्थित होते बिनविरोध निवडणूक झाल्यानंतर उपस्थित ग्रामपंचायत सदस्य ,गावातील नेते मंडळी व  ग्रामस्थांनी मा.सौ,समिना रज्जाक कोरबी
यांचे अभिनंदन केले तसेच पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या. तर कार्यकर्त्यांनी निवडीनंतर गुलालाची उधळण करत निवडीचा जल्लोष केला.


तर मा.सौ,समिना रज्जाक कोरबी ज्या वॉर्ड क्रमांक 3 मधून  निवडून आल्या आहेत त्या वार्डामध्ये स्वखर्चाने बोअर मारून गावच्या विकास कामास जोमाने सुरवात केली.
तर आज सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक मा महेंद्र आप्पा लाड यांनी नागठाणे  गावच्या नुतन ग्रामपंचायत उपसरपंच सौ. समीना रज्जाक कोरबी यांची निवड झाल्याबद्दल सत्कार केला.●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●