BANNER

The Janshakti News

भिलवडी : माळवाडी येथील मागासवर्गीय वस्तीमधे मंजूर असलेले सामाजिक सभागृहाचे बांधकाम तात्काळ सुरु करा... अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशारा...भिलवडी : माळवाडी येथील मागासवर्गीय वस्तीमधे मंजूर असलेले सामाजिक सभागृहाचे बांधकाम तात्काळ सुरु करा...

अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशारा...
.........................................................................

संपादक - भाऊसाहेब रुपटक्के
..........................................................................

भिलवडी | दि. २९ डिसेंबर २०२१

माळवाडी तालुका पलूस येथील मागासवर्गीय समाजासाठी पुणे पदवीधर मतदार संघाचे आमदार मा. अरुण आण्णा लाड यांच्या स्थानिक विकास निधीतून सामाजिक सभागृहाच्या बांधकामासाठी जवळपास पंधरा लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. हा निधी गेल्या सहा ते सात महिन्यांपूर्वी मंजूर झाला आहे.
परंतु माळवाडी ग्रामपंचायतीच्या बेदखल कारभारामुळे सदरचे काम अद्यापही सुरू झालेले नाही. सामाजिक सभागृह बांधण्यासाठी लागणाऱ्या जागेच्या कागदपत्रांची ग्रामपंचायत प्रशासनाने कोणतीही पडताळणी न केल्यामुळे सदर कामास विलंब लागला आहे. सदर बांधकामासाठी प्रस्तावासोबत दिलेल्या जागेची समस्या उद्भवल्या नंतर पर्यायी जागा उपलब्ध करण्यासाठी ग्रामपंचायतीने गेल्या पाच सहा महिन्यापासून कोणतीही हालचाल केली नसल्यामुळे येथील ग्रामपंचायत विषयी नागरिकांमधून संताप व्यक्त केला जात आहे.


पदवीधर आमदार अरुण अण्णा लाड यांच्या स्थानिक विकास निधीतून मंजूर झालेले सामाजिक सभागृह तात्काळ उभा रहावे यासाठी माळवाडी येथील मागासवर्गीय  समाजातील नागरिक , गावातील सामाजिक कार्यकर्ते व  राष्ट्रवादी काँग्रेसचे माळवाडीतील कार्यकर्ते   अनेक दिवसापासून माळवाडी ग्रामपंचायतीकडे जागेच्या उपलब्धतेसाठी पाठपुरावा करीत आहेत. परंतु ग्रामपंचायतीकडून कोणत्याही प्रकारचे योग्य उत्तर  मिळत नसल्यामुळे व त्यांच्याकडून कोणत्याही प्रकारच्या हालचाली दिसत नसल्यामुळे आज दिनांक 29 डिसेंबर रोजी    मागासवर्गीय समाजातील नागरिक व राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी माळवाडी ग्रामपंचायतीने बांधकामासाठी लागणारी जागा  तात्काळ उपलब्ध करून  द्यावी व  सामाजिक सभागृहाचे बांधकाम तात्काळ सुरू करण्यात यावे या मागणीचे निवेदन माळवाडी ग्रामपंचायतीचे सरपंच सुरय्या तांबोळी , उपसरपंच अजिंक्यकुमार कदम , सदर वार्डातील  लोकप्रतिनिधी भाग्यश्री वायदंडे , अर्चना तावरे , संपत सोनवले व माळवाडी ग्रामपंचायतीचे ग्रामविकास अधिकारी एच. ए. कांबळे यांच्याकडे देण्यात आले. माळवाडी येथील मागासवर्गीय समाजासाठी मंजूर असलेले सामाजिक सभागृहाचे बांधकाम तात्काळ सुरू न झाल्यास येणाऱ्या काळात तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा येथील मागासवर्गीय समाज व राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने  देण्यात आला आहे.यावेळी गावातील नेतेमंडळी , राष्ट्रवादीचे काँग्रेसचे कार्यकर्ते व सदर भागातील मातंग समाजातील नागरिक उपस्थित होते.●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●