BANNER

The Janshakti News

पलूस आगारातील एस. टी. कर्मचाऱ्यांच्या संपास हुमन राइट्स असोसिएशन फोर प्रोटेक्शन संघटना ,शाखा- पलूस यांचा जाहीर पाठिंबा....



पलूस आगारातील एस. टी. कर्मचाऱ्यांच्या संपास  हुमन राइट्स असोसिएशन फोर प्रोटेक्शन संघटना ,शाखा- पलूस यांचा जाहीर पाठिंबा....

पलूस | दि.09/11/2021

हुमन राइट्स असोसिएशन फोर प्रोटेक्शन संघटना ,शाखा- पलूस यांचे वतीने एस. टी. कर्मचाऱ्यांच्या संपास जाहीर पाठिंबा देण्यात आला .यासंबंधीचे पत्र एस.टी संघटनेचे पदाधिकारी यांना पलूस आगारामध्ये देण्यात आले याप्रसंगी एसटीचे कर्मचारी बहुसंख्येने उपस्थित होते.


एस. टी. महामंडळाचे शासनात विलीनकरण करून चालक,वाहक, यांत्रिक कनिष्ठ वेतन श्रेणी कामगार, कर्मचारी यांना शासकीय राज्य कर्मचारी प्रमाणे वेतन व दर वर्षी वेतन वाढ व महागाई भत्ता,ग्रेड पे,घर भाडे व नियमित वेतन मिळण्यासाठी 
सांगली जिल्ह्यातील पलूस येथील एस. टी. कामगार व कर्मचारी संघ यांचा गेल्या चार दिवसापासून संप चालू आहे. आज दि. ०९/११/२०२१ रोजी हुमन राइट्स असोसिएशन फोर प्रोटेक्शन संघटना ,शाखा- पलूस यांचे वतीने एस. टी. कर्मचाऱ्यांच्या संपास पाठिंबा देण्यात आला .
संघटनेच्या पाठिंब्याचे पत्र  संघटनेचे जिल्हाध्यक्ष श्री. दीपक( दादा )भोसले ,तालुका अध्यक्ष श्री. धनाजी पाटील यांचे हस्ते देण्यात आले याप्रसंगी संघटनेचे जनसंपर्क अधिकारी श्री प्रकाश कचरे ,तालुका उपाध्यक्ष श्री .प्रशांत जाधव, संघटनेचे माहिती अधिकारी श्री. मोहन जाधव ,कार्याध्यक्ष श्री .संजय आमणे ,संघटनेचे मार्गदर्शक श्री  .पाटील सर प्रख्यात बांधकाम व्यावसायिक व सामाजिक कार्यकर्ते श्री .आनंदराव मोरे ,आमनापूर (अनूगडेवाडी) चे पोलीस पाटील व सामाजिक कार्यकर्ते श्री. धनवडे साहेब व संघटनेचे कार्यकर्ते उपस्थित होते.