BANNER

The Janshakti News

सांगलीचे खासदार संजय काका पाटील यांचे वडील , माजी डीवायएसपी आर. के. पाटील यांचे वृद्धापकाळाने निधन....



दु:खद वार्ता...


सांगलीचे खासदार संजय काका पाटील यांचे वडील , माजी डीवायएसपी आर. के. पाटील यांचे वृद्धापकाळाने निधन....

तासगाव | दि.08/11/2021

सांगली जिल्ह्याचे भाजपचे खासदार संजयकाका पाटील यांना पितृशोक झाला आहे. त्यांचे वडील, माजी डीवायएसपी रामचंद्र कृष्णाजी पाटील यांचे वयाच्या ८८ व्या वर्षी वृद्धापकाळाने चिंचणी ता.तासगाव येथे राहत्या घरी निधन झाले आहे. त्यांना सर्वत्र तात्या या टोपण नावाने ओळखले जात होते.





गेल्या अनेक दिवसांपासून ते आजारी होते. त्यांच्यावर ठिकठिकाणी उपचार सुरू होते. मात्र वृद्धापकाळामुळे त्यांचे शरीर उपचारांना म्हणावे तसे साथ देत नव्हते, अखेर आज (सोमवार दि.०८/११/२०२१) सकाळी त्यांची प्राणज्योत मालवली.




तात्यांनी अनेक वर्षे पोलीस दलात उत्तम प्रकारे काम केले होते. डीवायएसपी या पदावरून ते सेवानिवृत्त झाले. खासदार संजयकाका पाटील यांना घडवण्यात तात्यांचा सिंहाचा वाटा होता. तात्यांच्या निधनाने खासदार पाटील कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.







तासगाव तालुक्यातील चिंचणी येथे रामचंद्र कृष्णाजी पाटील यांच्यावर शोकाकुल वातावरणामध्ये आज अंत्यसंस्कार करण्यात आले यावेळी खासदार संजय काका पाटील यांनी मुखाग्नी दिला. त्यांच्या निधनाचे वृत्त समजताच संपूर्ण जिल्ह्यातून सर्व पक्षाचे नेते पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी चिंचणी गावी धाव घेऊन रामचंद्र कृष्णाजी पाटील यांचे अंत्यदर्शन घेतले. चिंचणी येथील स्मशानभूमीत मोठ्या शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.


यावेळी राज्यमंत्री विश्वजीत कदम, माजी मंत्री अजितराव घोरपडे, आमदार अनिल भाऊ बाबर, विलासराव जगताप, सत्यजित देशमुख, विशाल पाटील, दिनकर पाटील, दीपक शिंदे, तासगावचे नगराध्यक्ष डॉक्टर विजय सावंत, पृथ्वीराज देशमुख, मनोज बाबा शिंदे, सांगली जिल्हा परिषदेचे सभापती प्रमोद शेंडगे, तासगाव पंचायत समितीचे सभापती संभाजीराव पाटील, वसंत आबा चव्हाण, सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक डॉक्टर प्रताप नाना पाटील, यासह जिल्ह्यातील सर्व पक्षांचे नेते पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिक यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते

रक्षा विसर्जन :-

वार/ दि. ----- बुधवार दि. १०/११/२०२१
वेळ ------------सकाळी ९:०० वाजता.
ठिकाण --------चिंचणी ता.तासगाव जि.सांगली

द.जनशक्ती न्यूज परिवाराकडून तात्यांना
भावपूर्ण श्रद्धांजली.....
त्यांच्या मृतआत्म्यास चिरशांती लाभो हीच ईश्वर चरणी प्रार्थना...