BANNER

The Janshakti News

भिलवडी येथील डॉ.आप्पासाहेब चोपडे ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्थेची गगनभरारी... धनगांव येथे नविन शाखेचे उद्घाटन....भिलवडी येथील डॉ.आप्पासाहेब चोपडे ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्थेची गगनभरारी...

 धनगांव येथे नविन शाखेचे उद्घाटन....

भिलवडी | दि.10/11/2021

डॉ.आप्पासाहेब चोपडे ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था भिलवडी या संस्थेच्या धनगाव शाखेचे उद्घाटन चितळे उद्योग समूहाचे संचालक  गिरीश चितळे यांच्या हस्ते संपन्न झाले.
यावेळी बोलताना गिरीश चितळे म्हणाले की,डिजिटल तंत्रज्ञानाचा उपयोग करून ग्रामीण भागात अर्थक्रांती करणाऱ्या डॉ.आप्पासाहेब चोपडे पतसंस्थेचे कामकाज आदर्शवत  आहे.


संस्थेचे संस्थापक व जिल्हा परिषद सदस्य सुरेंद्र वाळवेकर यांनी संस्थेची  सांपत्तीक स्थिती व  संस्था सभासदांसाठी राबवित असलेल्या विविध उपक्रमाबाबत सविस्तर माहिती दिली.जिल्हा परिषद सदस्य नितीन नवले,संस्थेचे चेअरमन श्रीधर वाळवेकर, डॉ.सुनिल वाळवेकर,धनगावचे सरपंच सतपाल साळुंखे,वसंतराव पवार,अधिकराव पाटील,दीपक भोसले,डॉ.सुमित साळुंखे,सचिन साळुंखे,घनश्याम साळुंखे,चंद्रकांत पाटील,रवींद्र साळुंखे, प्रा.रघुनाथ पवार, संदीप यादव ,मधुकर पाटील,संभाजी महिंद,  संस्थेचे संचालक ,सभासद, ग्रामस्थ उपस्थित होते.दत्ता उतळे यांनी आभार मानले.