yuva MAharashtra नागठाणे बंधारा येथील नदीपात्रामध्ये मृतावस्थेत, आढळून आली मगर... मृत मगरीला पाहण्यासाठी नागरिकांची मोठी गर्दी...

नागठाणे बंधारा येथील नदीपात्रामध्ये मृतावस्थेत, आढळून आली मगर... मृत मगरीला पाहण्यासाठी नागरिकांची मोठी गर्दी...




नागठाणे बंधारा येथील नदीपात्रामध्ये मृतावस्थेत, आढळून आली मगर...

मृत मगरीला पाहण्यासाठी नागरिकांची मोठी गर्दी...

भिलवडी | दि.०३/११/२०२१

पलुस तालुक्यातील नागठाणे येथील बंधाऱ्याजवळ, उत्तरवाहिनी कृष्णा नदीपात्रात बुधवार दि.०३ नोव्हेंबर रोजी सकाळी एक मगर मृत अवस्थेत आढळून आल्याने खळबळ उडाली होती.याबाबत वन विभागाला कळविल्यानंतर  वनक्षेत्रपाल पलुस कडेगाव पल्लवी चव्हाण, वनपाल मारुती ढेरे, वनरक्षक शहाजी ठवरे यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली.


वन विभागाकडून स्थानिक चौकशीनंतर मृत मगरीचा पंचनामा करून ती पलुस येथे शवविच्छेदनासाठी आणण्यात आली.आंधळी फाटा येथील माळावर तालुका पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. ऋतुराज कदम यांनी सदर मगरीचे शवविच्छेदन केले.




सदर मगर ही ११ फुट लांबीची, नर जातीची असून,शवविच्छेदनात सडलेल्या अवस्थेत असल्याने तिच्या मृत्यूचे नेमके कारण शोधणे अवघड आहे. 


तरीही तिच्यावरील जखमांवरून दोन नरांमधील संघर्षातून हा मृत्यू झाला असल्याची शक्यता डॉ. कदम यांनी व्यक्त केली. दरम्यान सकाळच्या सुमारास नागठाणे बंधारा येथील नदीपात्रामध्ये मृतावस्थेत मगर दिसून आल्याने, सदर मृत मगरीला पाहण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती.