BANNER

The Janshakti News

मिरजेत राष्ट्रवादीचा भव्य कामगार मेळावा संपन्न...मिरजेत राष्ट्रवादीचा भव्य कामगार मेळावा संपन्न...

सांगली : मिरज | दि.०६/१०/२०२१

सांगली : मिरज येथे राष्ट्रवादी कामगार सेल मिरज शहर याचे वतीने सर्व प्रकारच्या  बांधकाम कामगारांना संघटीत करून शासनाच्या सर्व प्रकारच्या योजनांची  माहिती कामगारांना देण्यात आली. मिरज शहर अध्यक्ष मा अल्लाबक्ष गडेकरी यांनी अतिशय नेटके नियोजन करून कामगारांना एकत्र केले या साठी युवानेते आझम काझी यांची मोलाची साथ लाभली


जिल्ह्याचे राष्ट्रवादीचे नेते तथा पालक मंत्री मा जयंत पाटील यांनी दिलेल्या आदेशा नुसार जिल्ह्यातील एक ही कामगार या योजनांच्यापासून वंचित राहू नये आणि त्यांचा हक्क त्यांना मिळावा म्हणून आम्ही सर्व पदाधिकारी जीव ओतून काम करीत आहोत असे जिल्ह्याचे राष्ट्रवादी युवक  कॉग्रेस अध्यक्ष मा राहुल पवार आपल्या भाषणात म्हणाले.


 सदर मेळाव्यास किमान एक हजार कामगारांनी उपस्तीती दर्शवली हे पाहून अल्लाबक्ष गडेकरी यांची राहुल पवार यांनी स्तुती केली आत्तापर्यंतचा मिरज शहरातील कामगारांचा इतका मोठा मेळावा आहे असे म्हणाले तसेच आझम काझी यानी पक्षाला गडेकरींच्या रुपात हिरा दिल्याचे म्हणाले 


कार्यक्रमाच्या सुरवातीस राष्ट्रवादी कामगार सेलचे जिल्हा अध्यक्ष मा विनायक हेगडे, कार्याध्यक्ष मा अफझल मुजावर,जिल्हा सचिव निवास गायकवाड यांची भाषणे झाली त्याच बरोबर महापौर मा. दिग्विजय सूर्यवंशी हे कामगारांना पाहून भारावून गेले 


आणि जिल्ह्यातील सर्व कामगारांनी आपली डिजिटल नोंदणी करावी असे आव्हानही केले ,यावेळी मिरज शहर उपाध्यक्ष म्हणून इरफान नदाफ व तौफिक शरीकमसलत  व अन्य पदाधिकारी यांच्या निवडीचे पत्र देण्यात आली शेवटी  युवानेते आझम काझी यांनी मान्यवरांचे, कामगारांचे आणि पत्रकारांचे  आभार मानले


 सदर कार्यक्रमास , मुसाभाई शेख,आसिफभाई नदाफ,भरत तोडकर, महावीर हुडे आणि इतर मान्यवर उपस्थित होते.