BANNER

The Janshakti News

पुरोगामी संघर्ष परिषदेचे सांगली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एक दिवसाचे धरणे आंदोलन..पुरोगामी संघर्ष परिषदेचे सांगली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एक दिवसाचे धरणे आंदोलन..

सांगली |  दि. ०५/१०/२०२१ 

 पुरोगामी संघर्ष परिषदेच्यावतीने सांगली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आर्थिक विकास महामंडळा कडील विविध मागण्यासाठी एक दिवसाचे धरणे आंदोलन करण्यात आले.हे धरणे आंदोलन पुरोगामी संघर्ष परिषदेच्या महाराष्ट्र राज्याच्या प्रदेशाध्यक्षा सौ.रतन लोखंडे पश्चिम महाराष्ट्राच्या अध्यक्षा सौ. स्वाती सौंदडे यांचे नेतृत्वाखाली झालेल्या आंदोलनात पुढील मागण्या करण्यात आल्या. 


१)लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आर्थिक विकास महामंडळाकडील सर्वच कर्ज माफ करा.
२) एनएसएफडीसी कडील महिलांच्या साठी मायक्रो कर्ज चालू करा.
३)महामंडळाचे बीजभांडवल वाढवा. 
४)महामंडळामध्ये मातंग समाजाला औद्योगिक क्षेत्रात प्रगती करण्यासाठी दहा ते एक कोटी पर्यंत चे कर्ज दोन टक्क्यांनी द्या. 


इत्यादी मागण्या करण्यात आल्या सदर आंदोलनामध्ये पुरोगामी संघर्ष परिषदेचे ग्रामीणचे जिल्हाध्यक्ष माननीय दीपक गाजागोळ, युवकचे जिल्हाध्यक्ष माननीय अक्षय खुडे ,महापालिका क्षेत्राचे अध्यक्ष दादासाहेब कांबळे, जिल्हा संघटिका सौ. नंदिनी वाघमारे, सांगली शहर अध्यक्षा सौ पूनम बेळगी महापालिका क्षेत्राच्या अध्यक्षा सौ. सुजाता कांबळे मिरज तालुक्याचे अध्यक्ष भास्कर खिलारे युवती जिल्हाध्यक्षा सौ. शुभांगी साळुंखे इत्यादी पदाधिकारी उपस्थित होते.