BANNER

The Janshakti News

तासगाव व नागेवाडी कारखान्याचे उर्वरीत बिलांचे धनादेश अदा... शेतकऱ्यांची दिवाळी आता होनार गोड....
तासगाव व नागेवाडी कारखान्याचे उर्वरीत बिलांचे धनादेश अदा...शेतकऱ्यांची दिवाळी आता होनार गोड....

भिलवडी | दि.०४/१०/२०२१

      तासगाव व नागेवाडी कारखान्यास सन २०२१ मध्ये गाळप झालेल्या ऊसाचे उर्वरीत बीलांचे धनादेश सोमवारी देण्यात आले. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कार्याध्यक्ष संदीप राजोबा यांनी ही माहिती दिली.


      राजोबा म्हणाले, तासगाव व नागेवाडी कारखान्याची गळीत हंगाम २०२१ मधील ऊस बिले गेली सात ते आठ महिने थकीत होती. स्वाभिमानी शेतकरी संघटनेने यासाठी सतत आंदोलने केली. शेतकऱ्यांना संपूर्ण रक्कम मिळाल्याशिवाय स्वाभिमानी संघटना गप्प बसणार नाही. एप्रिल महिन्यात संघटनेने थकित बिले मिळावीत यासाठी पहिले आंदोलन केले. खासदार संजय पाटील यांनी एका महिन्यात बिले देण्याचे यावेळी आश्वासन दिले. परंतू बिले न मिळाल्याने जून महिन्यात पुन्हा आंदोलन करण्यात आले. संजय पाटील यांनी पुन्हा आश्वासन दिले पण बिले दिली नाहीत.  पुन्हा आंदोलन छेडत तीन दिवस करण्यात आले. पहिल्या दिवशी काकांच्या जनसंपर्क कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. दुसऱ्या दिवशी भिक मांगो व तिसऱ्या दिवशी मुंडण आंदोलन करून निषेध नोंदवण्यात आला..


      बिलापोटी दिलेले धनादेश न वटल्याने १७ ऑगस्ट रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर अर्धनग्न मोर्चा काढण्यात आला.  त्यानंतर देण्यात आलेले सात कोटींचे धनादेश सप्टेंबर महिन्यात वटले. तरीही काही शेतकऱ्यांची ऊस बीले थकीत होती. याकारणास्तव स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संदीप राजोबा यांनी शेतकऱ्यांसह तासगाव कारखाना प्रशासनाची भेट घेतली. खासदार संजय पाटील यांच्याशी संपर्क साधण्यात आला. व्यवस्थापक आर डी पाटील यांच्याशी चर्चेनंतर २५ व ३० ऑक्टोबर रोजीचे धनादेश शेतकऱ्यांना देण्यात आले. यावेळी धन्यकुमार पाटील,  रोहित पाटील, कुमार पाटील, रामचंद्र कोळी, चेतन कुलकर्णी, ज्ञानू पवार, आकाराम गावडे, सादिक लांडगे, शकील लांडगे व शेतकरी उपस्थित होते.

तासगाव व नागेवाडी कारखान्याकडून बिले अदा
     दोन्ही कारखान्याचे मिळून २६ कोटी ३४ लाख ६३ हजारांचे बिलाचे धनादेश देण्यात आले. यामध्ये तासगाव कारखान्याचे १९ कोटी ९६ लाख ४६ हजार रुपये, नागेवाडीचे ६ कोटी ३८ लाख १७ हजार रूपये एकूण उर्वरीत ६३१६ शेतकऱ्यांना देण्यात आले.