BANNER

The Janshakti News

पूरग्रस्तांच्या अनुदानाच्या यादीत " फुटात बाराइंचाचा फरक " भिलवडी पाठोपाठ आता माळवाडीतील पूरग्रस्त नागरिक आक्रमक... २७ ऑक्टोंबर रोजी मातंग समाजातील पूरग्रस्त नागरिकांचे ग्रामपंचायतीच्या समोर बेमुदत आमरण उपोषण...



पूरग्रस्तांच्या अनुदानाच्या यादीत " फुटात बाराइंचाचा फरक " भिलवडी पाठोपाठ आता माळवाडीतील पूरग्रस्त नागरिक आक्रमक...

२७ ऑक्टोंबर रोजी मातंग समाजातील पूरग्रस्त नागरिकांचे ग्रामपंचायतीच्या समोर बेमुदत आमरण उपोषण...



भिलवडी | दि.23/10/2021

पलूस तालुक्यात सन २०१९ मध्ये कृष्णा नदीला आलेल्या महापुरात माळवाडी येथील मातंग समाजातील नागरिकांच्या घरांची पडझड होऊन मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. पडझड झालेल्या घरांचा जो सर्वे करण्यात आला होता तो पूर्ण चुकीच्या पद्धतीने सर्वे झाला होता यामुळे फेर सर्वे करण्याची मागणी करण्यात आली होती त्यानुसार फेर सर्वे करण्यात आला व अनुदानास पात्र ठरलेल्या पूरग्रस्तांच्या नावांच्या याद्या देखील प्रसिद्ध करण्यात आल्या परंतु अद्यापही


२०१९ च्या महापूरात घर पडझड झालेल्या अनेक नुकसानग्रस्त पूरग्रस्तांना शासनाने घरपडझडीचे अनुदान अद्यापही दिलेले नाही. तेंव्हा पासून ते आज पर्यंत हे पूरग्रस्त लोक लोकप्रतिनिधी व शासन दरबारी हेलपाटे घालत आहेत परंतु माळवाडी येथील मातंग समाजातील पूरग्रस्तांना आज पर्यंत आश्वासना शिवाय दुसरे काहीच मिळाले नाही.

महापूर, अतिवृष्टी, कोरोना या सारख्या महाभयंकर संकटांत हा मागासवर्गीय समाज पूर्णपणे उदवस्थ झाला असताना जुलै २०२१ च्या महापूराच्या सर्वे केलेल्या यादीत " फुटात बाराइंचाचा फरक झाला आहे " हा सर्वे पूर्णपणे चुकीच्या पद्धतीने करण्यात आला आहे.


महापूरात खरोखर ज्यांच्या घरांचे नुकसान झाले आहे अशा ४० ते ४५ पूरग्रस्तांची नांवे यादीतून चक्क गायब करण्यात आली आहेत. गावातील कांही भोगस पूरग्रस्तांनी सर्वे करण्यास आलेल्या भ्रष्ट अधिकाऱ्यांना हाताशी धरून बोगस अनुदान लाटण्याचे काम केले आहे. गावगाडा चालविणाऱ्या लोकांनी संबधित अधिकारी यांना चुकीची माहिती देऊन अनेक पूरग्रस्तांना अनुदानापासून वंचित ठेवण्याचे पाप केले आहे तर आपल्या जवळच्याच लोकांची नावे घालून शासनाची फसवणूक केली आहे.


जुलै २०२१ च्या महापूरात नुकसान झालेल्या पूरग्रस्तांच्या सर्वे मध्ये पूर्णपणे तफावत दिसून येत आहे.
२०१९ व २०२१ च्या महापुरातील घरपडझडीच्या अनुदानापासून जे पूरग्रस्त अद्यापही वंचित राहिले आहेत अशा वंचित पूरग्रस्तांना तात्काळ मदत मिळावी. प्रत्यक्षदर्शी सर्वे केलेल्या यादीमध्ये फेरबदल करणाऱ्यांची व चुकीचा सर्वे करणाऱ्या अधिकाऱ्यांची व ग्रामपंचायत प्रशासनाची चौकशी व्हावी. 
जुलै २०२१ मधील महापुरातील अनुदानाची चौकशी व्हावी.


अशा मागणीचे निवेदन पलूसचे तहसीलदार , पंचायत समितीचे गटविकास अधिकारी , जिल्हा परिषदेचे कार्यकारी अधिकारी व सांगली जिल्हाधिकारी यांना देण्यात आले आहे.सदरच्या निवेदनावर बाजीराव मोरे , कुमार मोरे , सुरेश कांबळे , तानाजी गेजगे , रविंद्र देवकुळे , चिरंजीवी मोरे , अनिल वाघमारे , बाजीराव वायदंडे आदीसह पूरग्रस्त नागरिकांच्या सह्या आहेत.
येत्या चार पाच दिवसांमध्ये प्रशासनाने या प्रमुख मागण्यांची दखल घेऊन योग्य ती कारवाई करावी व माळवाडी येथील मातंग समाजातील पूरग्रस्तांना न्याय द्यावा अन्यथा

दिनांक २७ ऑक्टोबर २०२१ रोजी सकाळी ९:०० वाजले पासून माळवाडी ग्रामपंचायतीच्या समोर बेमुदत आमरण उपोषण करण्यात येणार असल्याचा इशारा सदर निवेदनाद्वारे प्रशासनास देण्यात आला आहे.