BANNER

The Janshakti News

कारखानदारांना जाब विचारण्यासाठी 16 व 17 ऑक्टोबर रोजी स्वा.शेतकरी संघटनेचे सांगली जिल्ह्यात मोटरसायकल रॅलीचे आयोजन...कारखानदारांना जाब विचारण्यासाठी  16 व 17 ऑक्टोबर रोजी स्वा.शेतकरी संघटनेचे सांगली जिल्ह्यात मोटरसायकल रॅलीचे आयोजन...           
सांगली : दि.10/10/2021

एक रक्कमी एफ आर पी मिळालीच पाहिजे, वजनातील काटामारी थांबलीच पाहिजे, ऊस तोडणीसाठी पैसे देण्याची पद्धत बंद झाली पाहिजे यासाठी आणि 19 ऑक्टोबर रोजी  जयसिंगपूर येथे होणारी ऊस परिषद यशस्वी करण्यासाठी ऊस उत्पादकांच्यात जनजागृती आणि कारखानदारांना जाब विचारण्यासाठी शनिवार दिनांक 16 ऑक्टोबर व रविवार दिनांक 17 ऑक्टोबर रोजी जिल्ह्यात मोटरसायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. अशी माहिती स्वाभिमानीचे जिल्हाध्यक्ष महेश खराडे यांनी दिली.
 यावेळी महेश खराडे म्हणाले  या रॅलीला उदगिरी कारखाना बामणी पारे येथून शनिवारी सकाळी नऊ वाजता प्रारंभ होईल तेथून ही रॅली हातनोली, हातनूर, विसापूर मार्गे तासगाव कारखान्यावर येईल तेथून क्रांती साखर कारखाना , सोनहिरा कारखान्यावरून, राजारामबापू कारखाना साखराळे येथे ही रॅली येईल तेथून हुतात्मा कारखाना वाळवा येथे रॅली ची सांगता होईल प्रत्येक कारखान्यावर   सर्व मागणीचे निवेदन व इशारा देण्यात येणार आहे.  दुसऱ्या दिवशी रविवारी सकाळी नऊ वाजता  सर्वोदय कारखान्यांवरच प्रारंभ होईल , तेथून वसंतदादा सांगली, मोहनराव शिंदे आरग् , कागवाड   केंपवाड व सांगता कवठेमहांकाळ कारखान्यावर  होईल.  शिराळा व जत तालुक्यात स्वतंत्र रॅली काढण्यात येईल. जिल्ह्यात ऊस उत्पादकांच्या मध्ये प्रचंड नाराजी आहे तीन टप्प्यातील एफ आर पी कुणालाच मान्य नाही एक टप्प्यातच एफ आर पी मिळाली पाहिजे ही प्रामुख्याने सर्वांची मागणी आहे. त्याच बरोबर वजनातील काटामरी मुळे शेतकरी व वाहनधारक दोघांचेही नुकसान होत आहे ती थांबविणे गरजेचे आहे ऊसतोडणीसाठि ऊसतोडणी कामगारांच्या कडून शेतकऱ्यांची प्रचंड लूट सुरू आहे या सर्व बाबीसठी या रलीचे आयोजन करण्यात आले आहे. 

या रॅलीत पोपट मोरे, संदीप राजोबा, संजय बेले, भागवत जाधव, बाबा सांदरे, जगन्नाथ भोसले, राजेंद्र माने, संजय खोलखुंबे, भरत चौगुले,  शमशुद्दीन  संदे , दामाजी डूबल, सूरज पाटील , शिवाजी तानाजी धनवडे ,सचिन महाडिक ,अख्तर संदे , आदी पदाधिकाऱ्यांसह  मोठ्या संख्येने ऊस उत्पादकांनी सहभागी व्हावे असे आवाहन महेश खराडे यांनी केले आहे.