BANNER

The Janshakti News

आर.पी.आय.(आठवले) चे महाराष्ट्र प्रदेश सचिव मा. विवेकरावजी कांबळे यांचे प्रमुख उपस्थितीमध्ये भिलवडी शहर व जि.प.गट प्रमुख पदाच्या निवडी संपन्न.आर.पी.आय.(आठवले) चे महाराष्ट्र प्रदेश सचिव मा. विवेकरावजी कांबळे यांचे प्रमुख उपस्थितीमध्ये भिलवडी शहर व जि.प.गट प्रमुख पदाच्या निवडी संपन्न.

मिरज | दि.०९/१०/२०२१

आर.पी.आय.(आठवले) जिल्हा मध्यवर्ती तथा मिरज शहर जनसंपर्क कार्यालय मिरज येथे आज शनिवार दि. ०९/१०/२०२१ रोजी महाराष्ट्र प्रदेश सचिव मा. विवेकरावजी कांबळे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये पलूस कडेगाव तालूक्याची कार्यकर्ता आढावा बैठक आयोजित करणेत आली होती.
यावेळी आर.पी.आय.(आठवले) चे सांगली शहर जिल्हाध्यक्ष मा. पोपटभाऊ कांबळे, आय.टी.सेल चे सांगली जिल्हा अध्यक्ष मा. योगेंद्रभाऊ कांबळे, मिरज तालूकाध्यक्ष मा. अरविंद कांबळे, मिरज शहर अध्यक्ष मा. अविनाश कांबळे, पलूस तालूकाध्यक्ष मा. बोधीसत्व माने, माजी सांगली जिल्हाध्यक्ष मा. राजेश तिरमारे, युवक पलूस तालूकाध्यक्ष मा. अविराज काळबेग, पलूस तालुका कार्याध्यक्ष अमरजित कांबळे , पत्रकार मा. पंकज गाडे अविनाश काळेबाग सह आदी मान्यवर उपस्थित होते.यावेळी पलूस तालूक्यातील राजकीय, सामाजिक,शैक्षणिक, औद्योगिक,वैद्यकीय विषयावर सखोल चर्चा करणेत आली.यावेळी मा. कांबळे साहेब म्हणाले सांगली जिल्ह्यातील आगामी निवडणुकीच्या कार्यक्रमामध्ये रिपब्लिकन पक्ष आपले स्वतःचे उमेदवार स्वतः आर.पी.आय.(आठवले) च्या अधिकृत चिन्हावर निवडणूक लढवणार असून पलूस तालूक्यातील सर्व पक्ष पदाधिकार्यांनी कामाला लागायच आहे.रिपब्लिकन पक्षाची जास्तीत जास्त सभासद नोंदनी करून घ्यावी. तसेच तालूक्यातील कार्यकर्त्यांची बुथ कमिटीची संघटन करून प्रभागामध्ये अथवा वार्डामध्ये जोमाने कार्य करणेच्याची सुचना यावेळी मा. विवेकरावजी कांबळे यांनी दिली.यावेळी मिरज येथील विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे पुतळ्यास मा. विवेकरावजी कांबळे यांनी व माजी सांगली जिल्हाध्यक्ष मा. राजेश तिरमारे यांचे हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करणेत आले.


यावेळी भिलवडी शहर अध्यक्ष पदी मा. शरद तुकाराम कुरणे भिलवडी जि.प. गट प्रमुख पदी मा. राहुल सुनिल कुंदे यांची निवड करणेत आली.

यावेळी मा, विवेकरावजी कांबळे यांच्या हस्ते निवडपत्र देऊन व पुष्पहार घालून नवनिर्वाचीत पदाधिकार्यांचा सत्कार करणेत आला.

यावेळी पलूस तालूक्यामधून मोठ्या संख्येने  कार्यकर्ते उपस्थित होते.