BANNER

The Janshakti News

भिलवडी : वार्ड क्रं. 1 मधे स्वच्छतेला केली सुरुवात.. वार्ड नं.१ मधील नागरिक व RPI चे पदाधिकारी यांच्या प्रयत्नांना यश... अमरजीत कांबळे




भिलवडी : वार्ड क्रं. 1 मधे  स्वच्छतेला केली सुरुवात..

वार्ड नं.१ मधील नागरिक व RPI चे पदाधिकारी यांच्या प्रयत्नांना यश... अमरजीत कांबळे


" द.जनशक्ती न्यूज " च्या बातमीचा इफेक्ट...

भिलवडी | दि.१६/१०/२०२१

भिलवडी येथील वार्ड क्रमांक १ मधील नागरिकांनी व आर.पी.आय.च्या पदाधिकाऱ्यांनी केलेला पाठपुरावा व    "द.जनशक्ती न्यूज" वरून प्रसारित झालेल्या बातमीची दखल घेऊन वार्ड क्रमांक १ मधील पंचशील नगर येथील स्वच्छता मोहीमेस सुरुवात करण्यात आली आहे.



भिलवडी येथील वॉर्ड क्रमांक एक मधील कचऱ्याचे साम्राज्य व दुर्गंधीयुक्त वातावरणाच्या बाबतीत आर.पी.आय चे पदाधिकारी व वार्ड नं.१ मधील नागरिकांनी उठवलेला आवाजाचे वृत्त " द.जनशक्ती न्यूज " च्या माध्यमातून  प्रसारित करण्यात आले होते. ओला सुका कचरा काढून,त्या भागातील स्वच्छता करून औषध फवारणी करावी अशी मागणी  वार्ड क्रमांक १ मधील नागरिक व आर.पी.आयच्या वतीने करण्यात आली होती.त्यानंतर सदरचा कचरा लवकरात लवकर उचलून न नेल्यास, संबंधित वार्डातील कचरा गोळा करून, ग्रामपंचायतीच्या प्रांगणात टाकण्याचा इशारा आरपीआयचे पलूस तालुका कार्याध्यक्ष अमरजीत कांबळे यांनी निवेदनाद्वारे दिला होता. त्याची तात्काळ दखल घेऊन भिलवडी गावचे उपसरपंच पृथ्वीराज पाटील यांनी तात्काळ वार्ड क्रमांक १ मधील नागरिकांशी संवाद साधून, त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या व यापुढे या भागातील लोकांच्या समस्या तात्काळ सोडविल्या जातील असे आश्वासन दिले.


दिलेल्या आश्वासनानुसार उपसरपंच पृथ्वीराज पाटील यांनी स्वतः उपस्थित राहून,कर्मचाऱ्यांकडून दि.१६ ऑक्टोंबर रोजी वार्ड क्रमांक एक मधील पंचशील नगर येथील साठलेला कचरा गोळा करून ,येथील स्वच्छता करून, औषध फवारणी करून घेतली.
" द.जनशक्ती न्यूज " वरून प्रसारित झालेल्या बातमीचा इफेक्ट व वार्ड क्रमांक १ मधील नागरिक तसेच आर.पी.आय.चे तालुका कार्याध्यक्ष अमरजीत कांबळे, राहुल कुंदे, शरद कुरणे यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी केलेल्या पाठपुराव्यामुळे वार्ड क्रमांक १ मध्ये स्वच्छता मोहीम राबविण्यात आल्याने १६ ऑक्‍टोंबर रोजी आर. पी. आय.च्या वतीने ग्रामपंचायती समोर कचरा टाकण्याबाबत दिलेला इशारा व आंदोलन स्थगित करण्यात आले आहे. अशी माहिती अमरजीत कांबळे यांनी दिली.





Tags