BANNER

The Janshakti News

अखिल महाराष्ट्र कामगार - कर्मचारी संघाच्या शिष्टमंडळाने घेतली कामगार मंत्री हसन मुश्रीफ यांची भेट... बांधकाम कामगारांच्या संदर्भात विविध मागण्यांचे निवेदन हसन मुश्रीफ यांना सादर...



अखिल महाराष्ट्र कामगार - कर्मचारी संघाच्या शिष्टमंडळाने घेतली कामगार मंत्री हसन मुश्रीफ यांची भेट...

बांधकाम कामगारांच्या संदर्भात विविध मागण्यांचे निवेदन हसन मुश्रीफ यांना सादर...


कोल्हापूर | दि. १६ ऑक्टोबर २०२१

ऍड. प्रकाश आंबेडकरांच्या अखिल महाराष्ट्र कामगार - कर्मचारी संघाच्या सांगली जिल्ह्याच्या शिष्टमंडळाने आज कामगार मंत्री हसन मुश्रीफ यांची कोल्हापूर येथे भेट घेतली.यावेळी बांधकाम कामगारांच्या विविध मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले. सदर निवेदनात म्हटले आहे, महाराष्ट्र राज्य माथाडी सल्लागार समितीच्या 83 व्या बैठकीत मंत्रालयात, माथाडी कामगारांच्या हिताच्या दृष्टिकोनातून ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. आपण माथाडी मंडळाच्या नोकर भरतीत माथाडी कामगारांच्या मुलांना प्राध्यान्य देणार आहात. या आपल्या चांगल्या कामगारांच्या हिताच्या धाडसी निर्णयाचे आम्ही स्वागत करीत आहे. याचप्रमाणे, आपण महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कल्याणकारी मंडळाचे महाराष्ट्र प्रत्येक जिल्हाच्या ठिकाणी स्वतंत्रपणे मंडळाचे कार्यालय सूरू करीत आहात. त्या ठिकाणी मंडळाकडे नोंदणीकृत असणाऱ्या बांधकाम कामगारांच्या शिक्षित व उच्चक्षित मुलांना कायम नोकर भरतीसाठी प्रामुख्याने प्राधान्य देऊन   त्यांची मंडळाच्या विविध पदावर शैक्षणिक पात्रता नुसार नेमणूक करावी. आणि त्यांच्या जीवनातील अंधार दुर करावा. तसेच आपण मंडळाच्या मार्फत सुरू केलेल्या विविध शैक्षणिक कल्याणकारी योजनेच्या पैकी 
शैक्षणिक कल्याण योजना - EO5 मधील नोंदणीकृत बांधकाम कामगारांच्या मुलांचे व पत्नीचे वैद्यकीय क्षेत्रात शिक्षण घेण्यासाठी विविध वैद्यकीय अभ्यासक्रम, बी. फार्मसी आणि बी.एस.सी.नर्सिंग,जी.एन.एम.नर्सिंग तसेच जनरल नर्सिंग अभ्यासक्रमाकरिता मंडळा मार्फत प्रतिवर्षी 1 लाख रूपये अर्थ साह्य दिले जाते, परंतु काही नोंदणीकृत कामगार आपली नोंदणी दुसऱ्या वेळी ऑनलाईन रिनिव्ह करून शैक्षणिक कल्याण योजना - EO5 या शैक्षणिक लाभांसाठी ऑनलाईन अर्ज दाखल करीत असताना विविध वैद्यकीय अभ्यासक्रमाप्रमाणे बी. फार्मसी आणि नर्सिंग वैद्यकीय अभ्यासक्रमाकरिता असणारे ऑप्शन बंद केल्याचे दिसून येत आहे.त्यामुळे गोरगरिब कष्टकरी श्रमिक बांधकाम कामगारांनी आपण मंडळाच्या मार्फत सुरू केलेल्या कल्याणकारी योजनेच्या भरवशावर मुलांना, B फार्मसी आणि बी.एस.नर्सिंग, जी.एन.एम.नर्सिंग वैद्यकीय शिक्षण देण्यासाठी त्यांची परिस्थिती नसतानाही मोठ्या वैद्यकीय विद्यालयात प्रवेश घेतलेला आहे. परंतु शासनाकडून कोणत्याही परिपत्रक अथवा शासन निर्णय न होता,तसेच मंडळाकडे कामगारांच्या मुलांच्या शिक्षणासाठी मोठ्या रकमा नियोजन असताना देखील  मंडळाने एकतर्फी चूकीचा निर्णय मंडळाने घेतलेला आहे. शैक्षणिक कल्याण योजना - EO5 करता अभ्यासक्रम, B फार्मसी आणि नर्सिंग अभ्यासक्रमाकरिता ऑप्शन नसल्यामुळे ऑनलाईन अर्ज भरता येत नसल्यामुळे नोंदणीकृत बांधकाम कामगारांना त्यांच्या मुलांची वैद्यकीय शिक्षण घेण्यासाठी प्रत्येक वर्षी लाखो रूपये शैक्षणिक फी भरणे या कोरोना विषाणूच्या महाभयंकर कठीण परिस्थिती मध्ये मुश्किल होणार आहे. बांधकाम कामगारांना वेळेवर हाताला काम मिळत नसल्यामुळे  कुटुंबीयांना एक वेळचे जेवण देणे ही कठीण झाले आहे. अशा कठीण परिस्थितीत त्यांच्या मुलांना वैद्यकीय अभ्यासक्रम मधील, B फार्मसी आणि BSc नर्सिंग,G.N.M नर्सिंग व जनरल नर्सिंग शिक्षण पूर्ण करणे शक्य होणार नाही,परिणामी विद्यार्थ्यांना शिक्षण अर्धवट सोडावे लागेल त्यामुळे मोठ्या प्रमाणात त्यांच्या मुलांचे शैक्षणिक नुकसान होणार आहे.  या निर्णयामुळे बांधकाम कामगार व त्यांची उच्चशिक्षित मुले नाराज झालेली आहेत.बांधकाम कामगारांच्या वर मानसिक व शैक्षणिक आणि आर्थिक अन्याय होत आहे. तसेच वाढत्या व्हायरल इनफेक्शन प्रादुर्भाव मुळे सध्या गंभीर रोगांचे वेगवेगळ्या  साथी ने डोके वर काढलेले आहे. त्याचा मुकाबला व मात करण्यासाठी तसेच  रूग्णाची सेवा करण्यासाठी नव्या  उमीदाने तयार होत असणारे वैद्यकीय अभ्यासक्रम मधील, B फार्मसी आणि BSc नर्सिंग,G.N.M नर्सिंग व जनरल नर्सिंग क्षेत्रात शिक्षण असणाऱ्या विद्यार्थ्यांना सेवा करण्यासाठी संधी व प्रोत्साहन देऊन, आपण 


बांधकाम कामगारांच्या हितासाठी विधायक दृष्टिकोन लक्षात घेऊन, पूर्वी पासून सुरू असणारी वैद्यकीय क्षेत्रात विविध  अभ्यासक्रमाकरिता लागू असणारी शैक्षणिक कल्याण योजना - EO5 या योजनेत वैद्यकीय अभ्यासक्रम मधील,B फार्मसी आणि BSc नर्सिंग,G.N.M नर्सिंग व जनरल नर्सिंग पूर्वीच्या प्रमाणे एकत्रपणे जोडून शैक्षणिक कल्याण योजना - EO5, शैक्षणिक योजना सुरळीत व नियमित सुरू करावी. 

गोरगरिब श्रमिक कष्टकरी बांधकाम कामगारांना व त्यांच्या उच्चशिक्षित मुलांना योग्य न्याय द्यावा.नोंदणीकृत बांधकाम कामगारांच्या मुलींच्या विवाहासाठी 51 हजार देण्यासाठी मंडळाच्या मार्फत ठराव करण्यात आलेला आहे त्या ठरावास शासनाने त्वरित मंजुरी द्यावी त्यामुळे बांधकाम कामगाराना आर्थिक बोजा सहन करावा लागणार नाही. नोंदणीकृत बांधकाम कामगारांना हक्काचा निवारा मिळावा म्हणून ग्रामीण भागात घरकुलचा लाभ देण्याचे कल्याणकारी धोरणात्मक योजना सुरू आहे. त्याच धरतीवर शहरातील नोंदणीकृत बांधकाम कामगारांना घर बांधण्यासाठी आर्थिक साहाय्य द्यावे.
नोंदणीकृत बांधकाम कामगाराचा नैसर्गिक मृत्यू झाल्यावर दिला जाणारे त्याच्या कुटुंबीयाना आर्थिक साहाय्य मधील मयत कामगारांची वयाची अट रद्द करून वय 18 ते 59 मधील मयत कामगारांच्या वारसाना सरसकट एकसमान लाभ देण्यात यावेत या आमच्या मागण्या मान्य करून गोरगरीब श्रमिक कष्टकरी बांधकाम कामगार व त्यांच्या कुटुबियांना आधार द्या अशी मागणी करण्यात आली. 

यावेळी अखिल महाराष्ट्र कामगार - कर्मचारी संघ सांगली जिल्हाध्यक्ष संजय भूपाल कांबळे, सिद्धार्थ कोलप, प्रशांत वाघमारे, संजय कांबळे, सचिन कोलप, अस्लम मुल्ला, सिद्धार्थ कांबळे, सतिश कांबळे, युवराज कांबळे, विक्रांत सादरे, बाळासाहेब कांबळे, दिलीप रणदिवे, किशोर कुरणे, धर्मा बाडग्याल आदी उपस्थित होते.




Tags