BANNER

The Janshakti News

पलूस तालुक्यातील खंडोबाचीवाडी येथे काँग्रेस पक्षाला खिंडार... खंडोबाचीवाडी येथील काँग्रेस पक्षाच्या ३० युवा कार्यकर्त्यांनी केला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीत प्रवेश...
पलूस तालुक्यातील खंडोबाचीवाडी येथे काँग्रेस पक्षाला खिंडार...

खंडोबाचीवाडी येथील काँग्रेस पक्षाच्या ३० युवा कार्यकर्त्यांनी केला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीत प्रवेश...भिलवडी | दि.27/09/2021

पलूस तालुक्यातील खंडोबाचीवाडी येथील काँग्रेसच्या ३० युवा कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये प्रवेश करून, काँग्रेसच्या राज्यमंत्री विश्वजीत कदम गटाला जोराचा धक्का दिला आहे.
पलूस तालुक्यातील कृष्णाकाठावर काँग्रेस पक्षाचे मजबूत गठबंधन आहे.भिलवडी, अंकलखोप, नागठाणे, माळवाडी सह परिसरातील गावांना काँग्रेसचा बालेकिल्ला समजले जाते.या परिसरामध्ये स्थानिक संस्था, ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद, विधानसभा व लोकसभा या निवडणुकांमध्ये काँग्रेसला नेहमीच भरभरून यश मिळाले आहे. या यशामागे युवा पिढीचा नेहमीच मोठा हातभार लागला आहे परंतु सध्या 


पक्षांतर्गत सुरू असलेला श्रेयवाद, अंतर्गत कुरघोड्या व काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांची मुस्कटदाबी, व सन 2020/21 च्या ग्रामपंचायत निवडणुकीत नेतेमंडळी यांनी दिलेली आश्वासने न पाळल्यामुळे  नाराज झालेल्या  खंडोबाचीवाडी येथील काँग्रेस पक्षाचे  विशाल शिंदे  , अमोल शिरतोडे, रणजित बागल , हणमंत शिंदे , लखन जाधव यांच्यासह 30 कार्यकर्त्यांनी पदवीधर आमदार अरुण (आण्णा) लाड व शरद भाऊ लाड यांच्या विचारसरणीवर दृढ विश्वास व्यक्त करीत राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये प्रवेश केला.


त्यांचे स्वागत व पक्षप्रवेश जिल्हा परिषद सदस्य , युवक राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष मा . शरद भाऊ लाड यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी राष्ट्रवादी कॉग्रेस चे तालुका अध्यक्ष मोहन पाटील सर, कार्या अध्यक्ष डॉ विनायक महाडीक , दिपक मदने , रोहन यादव, नागेश पाटील ,विशाल जाधव व सर्व  पदाधिकारी उपस्थित होते.