BANNER

The Janshakti News

भिलवडी स्टेशन गोसावी वस्ती येथे कोरोना लसीकरण मोहीम...भिलवडी स्टेशन गोसावी वस्ती येथे कोरोना लसीकरण मोहीम...

दोनशे नागरिकांचे करण्यात आले लसीकरण...

भिलवडी स्टेशन गोसावी वस्ती येथे कोरोना प्रतिबंधक लसीकरण मोहीम राबविण्यात आली.यामध्ये दोनशे नागरिकांचे लसीकरण करण्यात आले.

भिलवडी | दि.27/09/2021

 भिलवडी स्टेशन  (गोसावी वस्ती ) येथे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ भिलवडी उपखंड यांच्या माध्यमातून  दोनशे नागरिकांचे कोविड शिल्ड  लसीकरण करण्यात आले. यावेळी संघाचे प्रत्येक गावातील युवक‌‌‌ स्वयंसेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या वेळी भिलवडी महाविद्यालयीन उपखंड प्रमुख सर्वहित माने
 म्हणाले की,आम्ही संघाचे माध्यमातून विविध उपक्रम राबविले आहेत तसेच राबवित असतो. २०१९ चा महापूर असो 
किंवा कोरोनासारखे महाभयंकर संकट असो प्रत्येक वेळी आम्ही संघाच्या माध्यमातून उपक्रम राबविले आहेत. महापूराकाळात जनावरांना चारा वाटप, कोरोनाच्या परिस्थितीत काढा वाटप असे विविध उपक्रम राबविले आहेत.त्याच पार्श्वभूमीवर  लसीकरण मोहीम राबविण्यात आली आहे.


कोरोना लसीकरण मोहिमेस नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळाला.गोसावी वस्ती भिलवडी स्टेशन येथे पार पडलेल्या या लसीकरण मोहिमेवेळी सुनिल पाटील , अविनाश  यादव ,वासुदेव जाधव सुखदेव जाधव, प्रथमेश कुलकर्णी, अविनाश भोई, गौरव कराडे,  गणेश फिरमे, सर्वहित माने यांच्यासह विविध स्वयंसेवक उपस्थित होते.