BANNER

The Janshakti News

वंचित बहुजन आघाडीत हजारो कार्यकर्त्याचा प्रवेश... महाराष्ट्रातील सर्वच स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका स्वबळावर लढणार ; रेखाताई ठाकूर यांची घोषणा..



वंचित बहुजन आघाडीत हजारो कार्यकर्त्याचा प्रवेश...
महाराष्ट्रातील सर्वच स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका स्वबळावर लढणार ; रेखाताई ठाकूर यांची घोषणा..


सांगली
दि.२८ सप्टेंबर २०२१

वंचित बहुजन आघाडी प्रदेशाध्यक्ष रेखाताई ठाकूर व राज्य कमिटी पदाधिकारी महाराष्ट्रभर दौऱ्या सुरू आहे .  सांगली जिल्ह्यात वंचित बहुजन आघाडीचा संघटन समीक्षा व संवाद मेळावा आयोजित केला होता. 




प्रदेशाध्यक्ष रेखाताई ठाकूर यांनी या मेळाव्याला संबोधित केले.रेखाताई ठाकूर म्हणाल्या, येणाऱ्या काळात महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका स्वबळावर लढणार असल्याची घोषणा केली. यावेळी ओबीसींच्या राजकीय आरक्षणावरून केंद्र व राज्य सरकारवर जोरदार टीका केली. आद.रेखाताई ठाकूर म्हणाल्या, सरकार ओबीसींना फसवत आहे. ओबीसींच्या राजकीय आरक्षण संदर्भात सर्वच पक्ष फक्त राजकारण करत आहेत. सरकारने सुप्रीम कोर्टात शपथ पत्र दिले आहे की,ओबीसींची जनगणना करता येणार नाही तसेच २०११ साली सरकारकडे इम्पीरिकल डाटा देण्यास नकार दिला आहे. या दोन कारणामुळे ओबीसींचे आरक्षण धोक्यात येत आहे. हा ओबीसी सोबत असणारा अन्याय आहे. ओबीसींच्या न्याय हक्काची पायमल्ली आहे म्हणून केंद्र सरकारचा आम्ही तीव्र निषेध करत आहोत. 


संवाद मेळाव्यात विविध पक्ष संघटनाच्या हजारो कार्यकर्त्यांनी वंचित बहुजन आघाडीत प्रवेश केला. वंचित बहुजन आघाडीत प्रवेश केलेल्या कार्यकर्त्यांची संख्या पाहता येणाऱ्या सांगली जिल्ह्याच्या राजकारणात प्रस्थापित पक्षाचा त्याच्यात भाषेत त्यांचा करेक्ट कार्यक्रम होईल. 


येणाऱ्या काळात होणाऱ्या निवडणुका  वंचित बहुजन आघाडी मुळे म्हणाव्या तश्या सोप्या होणार नाहीत अशी चर्चा सर्व सत्ताधारी पक्षात होत आहे. वंचित बहुजन आघाडीचे तरूण युवक यांची मताचे आकडेवारी मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे.त्यांमुळे प्रस्थापिताच्या पायाखालची वाळू सरकली आहे. 


 वंचित समूहातील हजारो कार्यकर्ते नागरिक मोठ्या उत्साहाने व शक्तीने पक्षात प्रवेश करत आहेत.
कार्यक्रमाचे आयोजन,वंचित बहुजन आघाडी सांगली जिल्हा  कार्यकारणी यांनी केले.