BANNER

The Janshakti News

अभिनेते संजय आव्हाड यांचा साध्या पद्धतीने अभिष्टचिंतन सोहळा संपन्न..

अभिनेते संजय आव्हाड यांचा साध्या पद्धतीने अभिष्टचिंतन सोहळा संपन्न..फुलंब्री | दि.15/09/2021

ग्रामीण भागातील एका सर्वसामान्य कुटूंबातील हरहुन्नरी कलाकार ज्याने प्रतिकुल परिस्थितीत उपलब्ध साधनांच्या जोरावर आपली कला जनतेसमोर मांडुन,फुलंब्री तालुक्याचा ठसा कलाक्षेत्रात उमटवत.आज नावारुपाला आलेला निधोना येथिल तरुण दिग्दर्शक व अभिनेता संजय आव्हाड जवळ असलेल्या मोबाईलवर आॕनलाईन लघुपट बनवुन ह्या क्षेत्रात पाऊल ठेवलं.व आज 7 ते 8 लघुपट व 8 ते 9 गाणी बनवुन रसिकांची शाबासकी मिळवलीयं.येणाऱ्या अनेक बिग बजेट प्रोजेक्टमध्येही लवकरच चांगल्या महत्वपुर्ण भुमिकेतुन ग्रामीण भागातील हा जिद्दी कलाकार आपणांस दिसणार आहे.

काल गणेशाच्या व आई-वडीलांच्या आशिर्वादाने अत्यंत साध्या पद्धतीने गावातील मित्रमंडळीने यांचा वाढदिवस साजरा केला.महाराष्ट्रातील अनेक कलाकारांच्या शुभेच्छाही प्राप्त झाल्या.

कलेची आवड तशी बालपणापासुनचं यांना होती.पण आई-वडील व कलाक्षेत्रातील आपले गुरु प्रविणकुमार अहिरे यांची प्रेणा व मार्गदर्शन मिळाल्याचे ते सांगतात.ग्रामीण भागातील इतरही तरुणांनीही ह्या क्षेत्रात उज्वल भविष्य करावे यासाठी साहित्यिक कला रंगमंच या संस्थेची स्थापनाही यांनी केली असुन.महाराष्ट्र चित्रपट सेनेचे जिल्हाध्यक्ष म्हणुनही ते काम बघत आहेत.अशा हरहुन्नरी उगवत्या सिनेकलाकारास प्रकटदिनाच्या हार्दिक शुभेच्छा...!!!