BANNER

The Janshakti News

बांधकाम कामगारांच्या शिक्षित मुलांना शासनाच्या कल्याणकारी मंडळात कायम नोकरी भरती मध्ये प्राधान्य द्या. - संजय कांबळे

बांधकाम कामगारांच्या शिक्षित मुलांना शासनाच्या कल्याणकारी मंडळात कायम नोकरी भरती मध्ये प्राधान्य द्या.
- संजय कांबळे


सांगली
दि. १५ सप्टेंबर २०२१

महाराष्ट्र इमारत कामगार व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळात नोंदणीकृत बांधकाम कामगारांच्या शिक्षित व उच्चशिक्षित मुलांना कायम स्वरुपी नोकरभरती मध्ये प्राधान्य द्यावे अशी मागणी मा.हसन मुश्रीफ यांच्याकडे, सांगली जिल्हा कामगार आयुक्त  मा.अनिल गुरव साहेब यांच्या द्वारे, 
आदरणीय ऍड.प्रकाश तथा बाळासाहेब यांच्या अखिल महाराष्ट्र कामगार - कर्मचारी संघ सांगली जिल्हाध्यक्ष मा.संजय भूपाल कांबळे यांनी निवेदन देऊन  केली आहे.
त्यांनी आपल्या निवेदनात असे म्हटले आहे की,आपण महाराष्ट्र राज्य माथाडी सल्लागार समितीच्या 83 व्या बैठकीत मंत्रालयात, माथाडी कामगारांच्या हिताच्या दृष्टिकोनातून ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. आपण माथाडी मंडळाच्या नोकर भरतीत माथाडी कामगारांच्या मुलांना प्राध्यान्य देणार आहात. या आपल्या चांगल्या कामगारांच्या हिताच्या धाडसी निर्णयाचे आम्ही स्वागत करीत आहे. याचप्रमाणे,आपण महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कल्याणकारी मंडळाचे महाराष्ट्र प्रत्येक जिल्हाच्या ठिकाणी स्वतंत्रपणे मंडळाचे कार्यालय सूरू करीत आहात. त्या ठिकाणी 
मंडळाकडे नोंदणीकृत असणाऱ्या बांधकाम कामगारांच्या शिक्षित व उच्चक्षित मुलांना कायम नोकर भरतीसाठी प्रामुख्याने प्राधान्य देऊन त्यांची मंडळाच्या विविध पदावर शैक्षणिक पात्रता नुसार नेमणूक करावी आणि त्यांच्या जीवनातील अंधार कायमचा दुर करावा. 
तसेच आपण मंडळाच्या मार्फत सुरू केलेल्या विविध शैक्षणिक कल्याणकारी योजनेच्या पैकी 
शैक्षणिक कल्याण योजना - EO5 मधील नोंदणीकृत बांधकाम कामगारांच्या मुलांचे व पत्नीचे वैद्यकीय क्षेत्रात शिक्षण घेण्यासाठी विविध वैद्यकीय अभ्यासक्रम, बी.फार्मसी आणि बी.एस.सी.नर्सिंग,जी.एन.एम.नर्सिंग तसेच जनरल नर्सिंग अभ्यासक्रमाकरिता मंडळा मार्फत प्रतिवर्षी 1 लाख रूपये अर्थ सहाय्य दिले जाते, परंतु काही नोंदणीकृत कामगार आपली नोंदणी दुसऱ्या वेळी ऑनलाईन रिनिव्ह करून शैक्षणिक कल्याण योजना - EO5 या शैक्षणिक लाभांसाठी ऑनलाईन अर्ज दाखल करीत असताना विविध वैद्यकीय अभ्यासक्रमाप्रमाणे बी. फार्मसी आणि नर्सिंग वैद्यकीय अभ्यासक्रमाकरिता असणारे ऑप्शन बंद केल्याचे दिसून येत आहे.त्यामुळे गोरगरिब कष्टकरी श्रमिक बांधकाम कामगारांनी आपण मंडळाच्या मार्फत सुरू केलेल्या कल्याणकारी योजनेच्या भरवशावर मुलांना, बी.फार्मसी आणि बी.एस.नर्सिंग, जी.एन.एम.नर्सिंग वैद्यकीय शिक्षण देण्यासाठी त्यांची परिस्थिती नसतानाही मोठ्या वैद्यकीय विद्यालयात प्रवेश घेतलेला आहे. परंतु शासनाकडून कोणत्याही परिपत्रक अथवा शासन निर्णय न होता,तसेच मंडळाकडे कामगारांच्या मुलांच्या शिक्षणासाठी मोठ्या रकमा नियोजन असताना देखील  मंडळाने एकतर्फी चूकीचा निर्णय मंडळाने घेतलेला आहे. शैक्षणिक कल्याण योजना - EO5 करता अभ्यासक्रम, बी. फार्मसी आणि नर्सिंग अभ्यासक्रमाकरिता ऑप्शन नसल्यामुळे ऑनलाईन अर्ज भरता येत नसल्यामुळे नोंदणीकृत बांधकाम कामगारांना त्यांच्या मुलांची वैद्यकीय शिक्षण घेण्यासाठी प्रत्येक वर्षी लाखो रूपये शैक्षणिक फी भरणे या कोरोना विषाणूच्या महाभयंकर कठीण परिस्थिती मध्ये मुश्किल होणार आहे. बांधकाम कामगारांना वेळेवर हाताला काम मिळत नसल्यामुळे  कुटुंबीयांना एक वेळचे जेवण देणे ही कठीण झाले आहे. अशा कठीण परिस्थितीत त्यांच्या मुलांना वैद्यकीय अभ्यासक्रम मधील फार्मसी आणि BSc नर्सिंग,G.N.M नर्सिंग व जनरल नर्सिंग शिक्षण पूर्ण करणे शक्य होणार नाही,परिणामी विद्यार्थ्यांना शिक्षण अर्धवट सोडावे लागेल त्यामुळे मोठ्या प्रमाणात त्यांच्या मुलांचे शैक्षणिक नुकसान होणार आहे.  या निर्णयामुळे बांधकाम कामगार व त्यांची उच्चशिक्षित मुले नाराज झालेली आहेत.बांधकाम कामगारांच्या वर मानसिक व शैक्षणिक आणि आर्थिक अन्याय होत आहे. तरी आपण बांधकाम कामगारांच्या हितासाठी विधायक दृष्टिकोन लक्षात घेऊन, पूर्वी पासून सुरू असणारी वैद्यकीय क्षेत्रात विविध  अभ्यासक्रमाकरिता लागू असणारी शैक्षणिक कल्याण योजना - EO5 या योजनेत वैद्यकीय अभ्यासक्रम मधील फार्मसी आणि BSc नर्सिंग,G.N.M नर्सिंग व जनरल नर्सिंग पूर्वीच्या प्रमाणे एकत्रपणे जोडून शैक्षणिक कल्याण योजना - 5 सुरळीत व नियमित सुरू करावी. गोरगरिब श्रमिक कष्टकरी बांधकाम कामगारांना व त्यांच्या उच्चशिक्षित मुलांना योग्य न्याय द्यावा.
गोरगरिब श्रमिक कष्टकरी बांधकाम कामगारांचे स्वप्न पूर्ण करून शुभेच्छा घ्याव्यात.
असे निवेदन सांगली जिल्हा कामगार आयुक्त सो यांच्या द्वारे देऊन, मा.हसन मुश्रीफ सो,कामगार मंत्री तथा अध्यक्ष,महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कल्याणकारी मंडळ यांना तसेच मा.मुख्यमंत्री सो यांच्या बरोबरच मंडळाच्या संबंधित असणाऱ्या सर्व विभागातील कामगार आयुक्त सो यांना ईमेल द्वारे कळवंले आहे.
त्यावेळी, आदरणीय ऍड. प्रकाश  तथा बाळासाहेब आंबेडकर यांच्या,अखिल महाराष्ट्र कामगार - कर्मचारी संघ,महाराष्ट्र राज्य सांगली जिल्हाध्यक्ष संजय भूपाल कांबळे,जिल्हा जनरल सेक्रेटरी संजय संपत कांबळे यांच्या बरोबर जिल्हा सदस्य युवराज कांबळे,अनिल अंकलखोपे,वसंत भोसले,सहदेव कांबळे,विक्रांत सादरे,संतोष माने,आंनदा गाडे,विक्रांत गायकवाड,वसंत गाडे,चंद्रकांत कांबळे,कुमार सुतार,राजू सय्यद, सुभाष पाटील,शिवकुमार वाली,ओंकार जाधव आदी उपस्थित होते.