BANNER

The Janshakti News

पूरग्रस्तांच्या मदतीसाठी भाजपचा पलूस तहसील कार्यालयावर धडक मोर्चा...

पूरग्रस्तांच्या मदतीसाठी भाजपचा पलूस तहसील कार्यालयावर धडक मोर्चा... 












पलूस | दि. 15/09/2021

पलूस तालुक्यात जुलै २०२१ मध्ये कृष्णा नदीला आलेल्या  महापुरामुळे नदीकाठच्या गावांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. परंतु पूर येऊन दीड महिना उलटून गेला  तरी शासनाने पूरग्रस्तांना सानुग्रह अनुदान व इतर कसल्याही प्रकारची नुकसान भरपाई दिलेली नाही. पूरग्रस्तांना तातडीने मदत करण्यात यावी या मागणीसाठी पलूस तालुक्यातील भारतीय जनता पक्षाच्या वतीने दि. १४ / ०९ / २०२१ रोजी माजी आमदार पृथ्वीराज बाबा देशमुख व जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संग्राम भाऊ देशमुख यांच्या नेतृत्वाखाली पलूस तहसील कार्यालयावर धडक मोर्चा काढण्यात आला. 


या मोर्चामध्ये तरुणांचा सहभाग हा लाक्षणिक होता.  आंदोलनामध्ये सहभागी झालेल्या प्रत्येक आंदोलकांच्या हातामध्ये विविध मागण्यांचे फलक व भारतीय जनता पक्षाचा झेंडा हातामध्ये घेऊन आघाडी सरकारच्या विरोधात घोषणा देत होते. त्याचबरोबर विद्यार्थ्यांची शालेय फी माफी झाली पाहिजे... शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी झाली पाहिजे... पूरग्रस्तांना तात्काळ मदत मिळाली पाहिजे..
 या मागणीच्या घोषणा हे पूरग्रस्त व आंदोलक देत होते..


 मोर्चा पुढे बोलताना माजी आमदार पृथ्वीराज देशमुख म्हणाले या धडक मोर्चाच्या माध्यमातून शेतकऱ्यांचा आक्रोश राजकर्त्यापर्यंत पोचवण्यात हे आंदोलन यशस्वी झाले असे म्हणता येईल कारण कोरोनाच्या महासंकटातही शेतकरी व नुकसानग्रस्त पूर पट्ट्यातील नागरीक मोठ्या प्रमाणावर या आंदोलनामध्ये सहभागी झाला आहे. त्याचबरोबर या आंदोलना मधील तरुणांचा सहभाग हा येणाऱ्या काळात सत्ताधाऱ्यांची डोकेदुखी ठरणार आहे असे देखील ते म्हणाले..


  यावेळी संग्राम देशमुख म्हणाले दोन महिन्यांपूर्वी आलेल्या महापुराच्या काळातील पूरग्रस्तांना अजूनही शासकीय मदत मिळालेली नाही यावरूनच आघाडी सरकारचा पूरग्रस्त  नागरिका विषयी असणारा खोटा कळवळा सिद्ध होत आहे. आघाडी सरकार निर्णय घेण्यास अपयशी ठरत आहे. देवेंद्र फडणवीस सरकारने पूरग्रस्त कुटुंबांना दुसऱ्या दिवशी मदत देऊन त्यांचे संसार सावरण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला. आत्ता सत्तेवर असणारी मंडळी त्यावेळी विरोधी बाकावर  भाजपच्या विरोधात होते. ते आता आघाडी सरकारमध्ये मंत्री पदावर आहेत तरीही पूरग्रस्त कुटुंबांना कोणतीच मदत मिळत नाही यावरून या नेत्याचा खोटा चेहरा जनतेसमोर आला आहे. ही सामान्य जनता अशा लोकप्रतिनिधींना जाब विचारल्याशिवाय गप्प राहणार नाही.